नेसरी पंचक्रोशीतील स्थानिक यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST2021-02-24T04:27:16+5:302021-02-24T04:27:16+5:30

नेसरीसह तळेवाडी, तारेवाडी, डोनेवाडी व गावठाण या पंचक्रोशीत दरवर्षी होणाऱ्या स्थानिक यात्रा कोविडच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याची माहिती नेसरी पोलीस ...

Local yatra at Nesari Panchkrushi canceled | नेसरी पंचक्रोशीतील स्थानिक यात्रा रद्द

नेसरी पंचक्रोशीतील स्थानिक यात्रा रद्द

नेसरीसह तळेवाडी, तारेवाडी, डोनेवाडी व गावठाण या पंचक्रोशीत

दरवर्षी होणाऱ्या स्थानिक यात्रा कोविडच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याची माहिती नेसरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश माने दिली.

नेसरी पोलीस ठाणे हद्दीतील नेसरी

पंचक्रोशीतील सरपंच, पुजारी, प्रतिष्ठित नागरिक, मानकरी, स्थानिक देवस्थान व्यवस्थापन समितीची आगामी स्थानिक देवयात्राबाबत पोलीस ठाणे येथे कोरोना पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे व कोविडच्या अनुषंगाने चर्चा होऊन परिसरातील यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता नेसरी पंचक्रोशीत आगामी १ मार्च २०२१ पासून होणाऱ्या सर्व यात्रा रद्द झाल्या आहेत. याबाबत माहिती सोशल मीडियासह पोस्टर लावून गावात माहिती देण्यात येत असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी दिली.

Web Title: Local yatra at Nesari Panchkrushi canceled