स्थानिक यंत्रणेमुळे जोतिबा यात्रा सुरळीत

By Admin | Updated: April 10, 2015 00:26 IST2015-04-09T22:23:48+5:302015-04-10T00:26:28+5:30

रिया सांगळे : जिल्हा प्रशासनाचा मोलाचा हातभार, सामाजिक संस्थांचा सहभाग

Local arrangements make Jyotiba travel smoothly | स्थानिक यंत्रणेमुळे जोतिबा यात्रा सुरळीत

स्थानिक यंत्रणेमुळे जोतिबा यात्रा सुरळीत

जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबाची चैत्र यात्रा नुकतीच झाली. यात्रेच्या नियोजनासाठी स्थानिक यंत्रणा व जिल्हा प्रशासन गेले दोन महिने सक्रिय होती. चैत्र यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यात यांचा मोलाचा वाटा आहे, अशी माहिती जोतिबाचे सरपंच
डॉ. रिया सांगळे यांनी दिली.
श्री जोतिबाची चैत्र यात्रा उत्साहात झाली. यात्रा काळात जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणेने कोणतीही तांत्रिक अडचणी भासू दिल्या नाहीत. यात्रेकरूंना जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. गेले दोन महिने हजारो हात यात्रा नियोजनासाठी राबत होते. जोतिबा ग्रामपंचायतीने मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छता यंत्रणा राबस्रवली. यात्रा काळात कोणतीही टंचाई जाणवली नाही. दोन एप्रिलला जोतिबा मंदिरालगत लागलेल्या आगीची सूचना सर्वप्रथम स्थानिक यंत्रणेने संबंधित विभागाला दिल्यामुळे आग आटोक्यात आली. ग्रामसेवक बीडकर यांनी घटनास्थळी जाऊन आग विझविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती जोतिबाचे सरपंच डॉ. रिया सांगळे यांनी सांगितले.
चैत्र यात्रेसाठी ५ ते ६ लाख भाविक आले होते. या सर्व भाविकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात स्थानिक यंत्रणा यशस्वी ठरली आहे. याशिवाय सेवाभावी संस्था, ट्रस्ट, फौंडेशन यांनी यात्रेकरूंना मोफत अन्नदान, पाणपोई, वाहन दुरुस्ती, आरोग्य तपासणी करून सेवा भाव जपला. पोलीस विभागाने राबविलेल्या दर्शनरांग व्यवस्थेमुळे भाविकाला एका तासात जलदगतीने दर्शन घेता आले. यंदाच्या यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा निर्विघ्न पार पडली. यामध्ये स्थानिक यंत्रणा, पुजारी, व्यापारी, देवस्थान समिती तसेच जिल्हा प्रशासन, सेवाभावी संस्था व सासनकाठीधारक भाविक यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे जोतिबा ग्रामपंचायतीने सांगून या सर्व घटकांचे आभार मानले आहेत.

चौकट बातमी



१५० झाडांना ग्रामसेवकांकडून जीवदान
जोतिबा चैत्र यात्रेदिवशी गिरोली गावाकडील भागात अचानक लागलेल्या आगीच्या वेळी पन्हाळा तालुक्यातील ग्रामसेवकांनी प्रसंगावधान साधून नुकतेच वनीकरण झालेल्या झाडांना लागलेली आग आटोक्यात आणली. या परिसरात जवळपास १५० झाडांची लागवड केली आहे. यावेळी गट विकास अधिकारी प्रियदर्शन मोरे या हजर होत्या.

Web Title: Local arrangements make Jyotiba travel smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.