‘गडहिंग्लज'च्या सभासदांना १० टक्के व्याजदराने कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:11+5:302021-02-23T04:36:11+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समिती स्तरावरील जिल्हा परिषदेचे कर्मचारी, सहकारी संस्थेच्या सभासदांच्या कर्जात दीड टक्क्याची कपात करण्याचा निर्णय संचालक ...

Loans at 10% interest to Gadhinglaj members | ‘गडहिंग्लज'च्या सभासदांना १० टक्के व्याजदराने कर्ज

‘गडहिंग्लज'च्या सभासदांना १० टक्के व्याजदराने कर्ज

गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समिती स्तरावरील जिल्हा परिषदेचे कर्मचारी, सहकारी संस्थेच्या सभासदांच्या कर्जात दीड टक्क्याची कपात करण्याचा निर्णय संचालक मंडळाने एकमताने घेतला आहे. त्यामुळे सभासदांना ११.५० ऐवजी १० टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजन दड्डीकर यांनी दिली.

दड्डीकर म्हणाले, २०१९-२० मध्ये संस्थेत १५ कोटींच्या ठेवी, तर १२ कोटी ५० लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. ४ कोटींची गुंतवणूक असून ३६ लाख ७१ हजारांचा नफा झाला आहे. अलीकडेच संस्था भडगाव रोडवरील किरणोदय व्यापारी संकुलातील स्वमालकीच्या सुसज्ज वास्तूत स्थलांतरित झाली आहे.

ठेवींसाठी आकर्षक व्याज दिले जाते. १ ते ३ महिन्यांसाठी ६ टक्के, ४ ते ११ महिन्यांसाठी ७ टक्के, १२ महिने व पुढील कालावधीसाठी ७.२५ टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.५० टक्के व्याज दिले जाते. तसेच सभासदांना पगाराच्या प्रमाणात २० लाखांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

यावेळी उपाध्यक्षा मंगल पाटील, संचालक प्रभाकर चौगुले, गंगाप्पा डंगी, चंद्रकांत भोईर, विनायक काटकर, विश्वास पाटील, प्रभावती बागी, राजेंद्र कोरवी व कर्मचारी उपस्थित होते.

--

* राजन दड्डीकर : २१०२२०२१-गड-०५

Web Title: Loans at 10% interest to Gadhinglaj members