(जगणे बदलले-) सांस्कृतिक, खाद्यपदार्थांची अभिरूची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST2020-12-31T04:23:19+5:302020-12-31T04:23:19+5:30
लॉकडाऊन झाल्यानंतर जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आली. रसिकरंजनाचे उपक्रम थांबले. मात्र, सांस्कृतिक जग थांबले नाही. कलावंतांनी फेसबुकवर ‘लाईव्ह शो’ ...

(जगणे बदलले-) सांस्कृतिक, खाद्यपदार्थांची अभिरूची
लॉकडाऊन झाल्यानंतर जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आली. रसिकरंजनाचे उपक्रम थांबले. मात्र, सांस्कृतिक जग थांबले नाही. कलावंतांनी फेसबुकवर ‘लाईव्ह शो’ सुरू केले. रंगकर्मी प्रशांत जोशी यांची प्रतिज्ञा नाट्यरंग गरजूंच्या मदतीसाठी धावली. लॉकडाऊनमध्ये गायकांनी फेसबुक लाईव्ह केले. अनेक नामांकित संस्था, सामाजिक संघटनांच्यावतीने मान्यवरांची लाईव्ह व्याख्याने झाली, झूम कॉल, गुगल मीटवर चर्चा, परिसंवाद झाले. नृत्याचे कार्यक्रम,ओरिगामी, पॉट पेंटिंग अशा कार्यशाळा झाल्या. तंत्रज्ञानाने सांस्कृतिक जीवन बहरले.
स्वयंपाकघरही हसले..
ऑफिस, अपॉईंटमेंट, टार्गेटमध्ये जगताना चहा बनविणे माहीत नसलेल्या पुरुषांनी स्वयंपाकघरात वेगवेगळे खाद्यपदार्थ केले. केकच्या प्रीमिक्सपासून ते चीज, पनीर, पिझ्झा बेससारख्या साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दी झाली. मन्च्युरिअन, फ्राईड राईस, वडापाव, टोस्टसारख्या फास्ट फूडपासून ते पारंपरिक पदार्थ मसालेभात आणि चपाती लाटण्यापर्यंतच्या प्रयोगांनी स्वयंपाकघर हसले. सोफ्यावर बसून हे सगळं बघताना महिलांच्या मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या. भांडी घासणे हे महिलांचेच काम असते हा पारंपरिक समजही गळून पडला.