‘दौलत’च्या निवृत्त कामगार देणी यादी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:16 IST2021-07-09T04:16:02+5:302021-07-09T04:16:02+5:30

कोल्हापूर : निवृत्त कामगारांच्या देणे रकमांची यादी दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याने द्यावी, अशी सूचना साखर ...

List the retired workers' dues of 'Daulat' | ‘दौलत’च्या निवृत्त कामगार देणी यादी द्या

‘दौलत’च्या निवृत्त कामगार देणी यादी द्या

कोल्हापूर : निवृत्त कामगारांच्या देणे रकमांची यादी दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याने द्यावी, अशी सूचना साखर संचालक डॉ. एस. एन. जाधव यांनी केली आहे. असे पत्रक सर्व श्रमिक संघाच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

दौलत कामगारांच्या देणे रकमांबाबत सहसंचालक यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही सूचना करण्यात आली. या देणे रकमांबाबत सर्व श्रमिक संघाने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले होते. त्यांच्या सूचनेनुसार साखर सहसंचालक कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अथर्व कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते. श्रमिक संघाच्यावतीने अतुल दिघे, जे. जी. पाटील, गावडे उपस्थित होते.

करारातील देय रकमा कोणत्या कामगारांच्या किती आहेत, याचा तपशील कामगारांना समजणे आवश्यक आहे. तशी यादी कारखान्याच्या सूचना फलकावर लावावी, असे मत दिघे यांनी मांडले. यानंतर कारखान्याच्या संचालकांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: List the retired workers' dues of 'Daulat'