फोर्ब्सच्या यादीत ॲड. युवराज नरवणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST2021-04-03T04:21:02+5:302021-04-03T04:21:02+5:30

कोल्हापूर : जगद्विख्यात फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वोत्तम आणि प्रभावशाली वकिलांच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये ॲड. ...

In the list of Forbes, Adv. Yuvraj Narvankar | फोर्ब्सच्या यादीत ॲड. युवराज नरवणकर

फोर्ब्सच्या यादीत ॲड. युवराज नरवणकर

कोल्हापूर : जगद्विख्यात फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वोत्तम आणि प्रभावशाली वकिलांच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये ॲड. युवराज नरवणकर यांचा यावर्षी समावेश केला आहे. दरवर्षी उद्योग क्षेत्रातील नामांकने फोर्ब्सतर्फे जाहीर केली जातात. यावर्षी पहिल्यांदाच कायदा क्षेत्राचा समावेश या नामांकनांमध्ये केला होता.

नरवणकर सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे कार्यरत असून अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आणि याचिकांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. न्यायालयातील अनुभव, लवाद क्षेत्रातील काम आणि तंत्रज्ञान कायद्यातील प्रभुत्व हे निकष नामांकनासाठी वापरले गेले.

नरवणकर मूळ कोल्हापूरचे. त्यांचे उच्च शिक्षण मुंबई आणि लंडन येथे झाले आहे. यावर्षीच्या नामांकन आणि अंतिम निवड समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मदन लोकूर, न्यायमूर्ती ए. के. सिक्री, सह-सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी, सर्वोच्च न्यायालयातील सिद्धार्थ लुथ्रा यांसह इतर अनेक वरिष्ठ अधिवक्ता आणि चार नॅशनल लॉ स्कूलचे कुलगुरू यांचा समावेश होता.

काल दिल्ली येथे व्हर्च्युअल स्वरूपात झालेल्या कार्यक्रमामध्ये या नावांची घोषणा करण्यात आली. लवकरच या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर देखील होणार आहे.

फोटो : ०२०४२०२१-कोल-युवराज नरवणकर

Web Title: In the list of Forbes, Adv. Yuvraj Narvankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.