३८२ मतदारांची यादी प्रसिद्ध
By Admin | Updated: November 28, 2015 00:40 IST2015-11-28T00:34:45+5:302015-11-28T00:40:34+5:30
विधानपरिषद निवडणूक : ‘स्वीकृत’बाबत आयोगाच्या मार्गदर्शनानंतर निर्णय

३८२ मतदारांची यादी प्रसिद्ध
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी ३८२ मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. महापालिकावगळता जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या स्वीकृत सदस्यांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यावर बुधवार (दि. २ डिसेंबर)पर्यंत हरकतींसाठी मुदत असून, ९ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सकाळी प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (निवडणूक शाखा), जिल्हा परिषद कार्यालय, कोल्हापूर, महानगरपालिका कार्यालय, कोल्हापूर आणि सर्व नगरपरिषद या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये ३८२ मतदार असून, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यांच्याचाही समावेश आहे. स्वीकृत सदस्यांची नावाबाबत जिल्हा निवडणूक विभागाने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानंतर ‘स्वीकृत’ची नावे यादीत ठेवायची की कमी करायची, हा निर्णय जिल्हा निवडणूक विभागाकडून घेतला जाणार आहे. प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी बुधवार (दि. २ डिसेंबर) असा आहे. (प्रतिनिधी)
प्रारूप मतदार यादीतील मतदार
स्था. स्व. मतदार संघनिवडून स्वीकृतएकूण
आलेले सदस्य
जिल्हा परिषद६९१२८१
महानगरपालिका८१—८१
इचलकरंजी नगरपालिका ५७०५६२
जयसिंगपूर नगरपालिका२३०२२५
गडहिंग्लज नगरपालिका१७०२१९
कागल नगरपालिका १७०२१९
मुरगूड नगरपालिका१७०२१९
पन्हाळा नगरपालिका१७०२१९
मलकापूर नगरपालिका१७०२१९
वडगाव नगरपालिका१७०२१९
कुरुंदवाड नगरपालिका१७०२१९
एकूण ३४९३३३८२
महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांचा पत्ता कट
महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची अद्याप निवडच जाहीर झालेली नाही. आता आचारसंहिता लागू झाल्याने ही निवड आता करता येत नाही. त्यामुळे या पाच सदस्यांची नांवे महापालिकेकडून जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे पाठविण्यात आली नाहीत. परिणामी त्यांना वगळूनच प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.