याबाबत कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बहिरेवाडी ता पन्हाळा येथील बाबू पार्क येथून अमृतनगरकडे चार चाकी गाडी क्र एम एच ०९ इयु ५,७०७ मधून ९,९८४० किमतीचे ४० बॉक्स घेऊन ही गाडी जात होती. पोलिसांना मिळालेल्या माहिती वरून सोमवार रात्री आकाराच्या सुमारास कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील व करवीर विभाग तपास पथकांनी सापळा रचून ही गाडी पकडली . सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होत असल्याने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करीत मास्क न वापरता व कोणतेही कापड न वापरता या गाडीतून बेकायदा विना परवाना विक्री करणेचे उद्देशाने दारू नेली जात असल्याने ती जप्त केली. या प्रकरणी दोघांवर दारू बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून ताब्यात घेतले आहे.
फोटो ओळ
बहिरेवाडी ( ता पन्हाळा ) येथे जप्त करण्यात आलेली देशी दारु