शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील किणीजवळ ३५ लाखांचा मद्यसाठा जप्त, एकास अटक; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

By उद्धव गोडसे | Updated: March 2, 2023 16:13 IST

विदेशी बनावटीचा मद्यसाठा मुंबईच्या दिशेने निघाला होता घेऊन

कोल्हापूर : विदेशी बनावटीचा मद्यसाठा मुंबईच्या दिशेने घेऊन जाणारा कंटेनर पकडून ३५ लाख ५३ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी गावाजवळ आज, गुरुवारी (दि. २) सकाळी कारवाई केली. कंटेनरचालक दिनेश जेकनराम कुमार (वय ३०, रा. कावोकी बेरी, जि. बाडमेर, राजस्थान) याला पथकाने अटक केली.पुणे-बेंगळुरू महामार्गावरून एका सहाचाकी कंटेनरमधून विदेशी मद्यसाठा मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त बी. एच. तडवी यांना मिळाली होती. त्यानुसार तडवी यांनी निरीक्षक एस. जे. डेरे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. महामार्गावर किणी गावाजवळ दबा धरून बसलेल्या पथकाने गुरुवारी सकाळी एक संशयित वाहन अडवले. त्याची झडती घेताना विदेशी मद्याचे ४०० बॉक्स आढळले. पथकाने ३५ लाख ५३ हजार २०० रुपयांचे मद्य आणि ११ लाख रुपयांचा कंटेनर असा ४६ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.कंटेनर चालक दिनेश कुमार याला अटक केली असून, मद्यसाठा कुठून आणला आणि कोणाला पाठवला जाणार होता, याचा तपास सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले. आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे, योगेश शेलार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस