शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

अलिशान कारमधून दारुची तस्करी, कोल्हापुरात ९ लाखांच्या मुद्देमालासह तरुणास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:04 IST

सापळा रचला, कारचा पाठलाग करून केली कारवाई

कोल्हापूर : बेकायदेशीररीत्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणारी अलिशान कार राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी दुपारी पकडली. या कारमधून सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांच्या मद्याच्या बाटल्या आणि अलिशान कार, असा एकूण ८ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई शुक्रवारी दुपारी सायबर चौक ते राजाराम कॉलेज रोडवर करण्यात आली. याप्रकरणी चालक प्रथमेश यशवंत पाटील (वय २३, रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजारामपुरी परिसरातून एका अलिशान कारमधून देशी-विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिस हवालदार संदीप सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सायबर चौक ते राजाराम कॉलेज मार्गावर सापळा रचला होता.दुपारी साडेतीनच्या सुमारास एक संशयित कार सायबर चौकातून भरधाव वेगाने जात असल्याचे दिसल्याने पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या कारचा पाठलाग करून राजाराम कॉलेजच्या गेटसमोर ती कार थांबवत तपासणी केली असता, २ लाख ८५ हजार रुपयांच्या वेगवेगळ्या कंपनींच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या.कार चालक प्रथमेश पाटील याला ताब्यात घेऊन, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अंमलदार अमोल पाटील, कृष्णात पाटील, सचिन पाटील, संदीप सावंत, सत्यजीत सावंत, विशाल शिरगावकर आणि सुशांत तळप यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Luxury Car Used for Liquor Smuggling; Youth Arrested in Kolhapur

Web Summary : Kolhapur police seized a luxury car carrying illegal liquor worth ₹2.85 lakhs. The driver, Prathamesh Patil, was arrested near Rajaram College. Acting on a tip, police intercepted the car and found various brands of liquor. Total value of seized goods: ₹8.85 lakhs.