शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग अखेर झाला जागा; कोल्हापुरात तेरा भरारी पथकांद्वारे लिंकिंग तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:12 IST

दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश : गुणनियंत्रण निरीक्षकांवर जबाबदारी

कोल्हापूर : युरियासह इतर खतांवर शेतकऱ्यांना नको असणारी रासायनिक खते माथी मारली जात आहेत. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी लिकिंग करणाऱ्याविरोधात कारवाईचे आदेश दिले असतानाही राजरोसपण लिकिंग दिले जाते, हा विषय ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर कृषी विभागाला अखेर जाग आली. त्यांनी जिल्ह्यात तेरा भरारी पथकाद्वारे घाऊक व किरकोळ खतविक्रेत्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसात याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.खत उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना नको असणारी खते विक्रेत्यांच्या माध्यमातून देतात, या तक्रारीबद्दल दि. ६ जानेवारी रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी खत कंपन्या व विक्रेत्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात घेतली होती. लिकिंग करणाऱ्याविरोधात थेट कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तरीही, कंपन्यांची मग्रुरी वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.याबाबत, ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविल्यानंतर कृषी विभागाने तपासणीचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील सर्व गुणनियंत्रण निरीक्षकांना तपासणी करण्याचे आदेश काढले. त्यानुसार तेरा भरारी पथकामार्फत विक्रेत्यांची तपासणी सुरू झाली आहे. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी सारिका रेपे, मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतीश देशमुख हे उपस्थित होते.‘आरसीएफ’, ‘चंबळ’ वर नजरदोन-तीन दिवसांपूर्वी लागलेल्या रेकमध्ये ‘आरसीएफ’ व ‘चंबळ’ या खत उत्पादक कंपनीचे खत वाटप सुरू आहे. खत उपलब्ध झालेल्या विक्रेत्यांची तपासणी सुरू असून, त्यांनी काही लिकिंग दिले का? याची माहितीही घेतली जात आहे.

रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यासाठी खतांची उपलब्धता व वाटपाबाबत नियोजन करण्यात आले असून, मंजूर आवंटनाप्रमाणे खताची पुरेशी उपलब्धतता आहे. - सारिका रेपे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र