शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह प्रकरणी लिंगनूरच्या पतीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 13:26 IST

इचलकरंजीतील बालविवाह करून दिलेल्या सख्ख्या बहिणींपैकी खटाव लिंगनूर (ता. मिरज) येथील अल्पवयीन मुलीच्या पतीस मिरज ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि. ७) अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

ठळक मुद्देबालविवाह प्रकरणी लिंगनूरच्या पतीस अटक इचलकरंजीतील मुलगी : वडिलांचा पोलिसांकडून शोध

कोल्हापूर : इचलकरंजीतील बालविवाह करून दिलेल्या सख्ख्या बहिणींपैकी खटाव लिंगनूर (ता. मिरज) येथील अल्पवयीन मुलीच्या पतीस मिरज ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि. ७) अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

मुलीचे वडील आणि आजोबांचाही हे लग्न लावून देण्यात सहभाग असल्याने त्यांचाही पोलीस शोध घेत असल्याचे तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी लोकमतला सांगितले.या विवाहास कारणीभूत ठरल्याप्रकरणी २८ ऑगस्टला पती व वडिलांसह तिघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ (पोक्सो) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शिवाजीनगर इचलकरंजी पोलिसांत मूळ गुन्हा दाखल आहे.

पीडित अल्पवयीन असतानाही लग्न लावल्याची तक्रार कोल्हापुरातील अवनि संस्थेच्या प्रमुख अनुराधा भोसले यांनी दिली आहे. या प्रकरणी सचिन अर्जुन माने (रा. खटाव लिंगनूर, ता. मिरज) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

मूळच्या इचलकरंजीच्या १५ व १३ वर्षांच्या या मुली वडिलांकडून छळ होतो म्हणून अवनि संस्थेत दाखल झाल्या होत्या. त्यांतील एका मुलीचे लिंगनूर येथे व दुसऱ्या मुलीचे खोतनट्टी (ता. अथणी) येथे वडिलांनीच लग्न लावून दिल्याची तक्रार आहे. लिंगनूर येथील मुलीची गेल्या महिन्यात प्रसूतीही झाली आहे. तिला मुलासह बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे.

खोतनट्टी येथील विवाह झालेल्या अल्पवयीन मुलीस बेळगावच्या बालकल्याण समितीने ताब्यात घेतले असल्याचे समजते. तिलाही लवकरच बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली; परंतु कोल्हापूरच्या समिती सदस्यांनी त्याला दुजोरा दिला नाही.मुलगा वडिलांसमवेतच...या दोन्ही मुलींना धाकटा भाऊ आहे. तो वडिलांसोबत इचलकरंजी येथे राहतो. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सागर दाते यांनी त्याची भेट घेतली; परंतु त्याने आपण वडिलांसमवेतच राहणार असल्याचे लेखी लिहून दिले आहे. तशी माहिती दाते यांनी समिती व इचलकरंजी पोलिसांना दिली. कोणतेही मूल त्याच्या आईवडिलांसमवेत राहत असल्यास त्यालाच प्राधान्य दिले जाते.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर