हवेच्या कुशीत आकाशाला अंगाई !

By Admin | Updated: July 20, 2014 23:18 IST2014-07-20T23:14:02+5:302014-07-20T23:18:25+5:30

‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच दानशूरांचे असंख्य हात पुढे

Light of the sky on the sky! | हवेच्या कुशीत आकाशाला अंगाई !

हवेच्या कुशीत आकाशाला अंगाई !

एअरबेड भेट : मीनाक्षी स्पेशालिटी हॉस्पिटलकडून महिनाभराची औषधेही प्रदान
सातारा : शेंदुरजणे येथील आकाश मुकुंद येवले या चिमुकल्याच्या उपचारांसाठी मदतीचे असंख्य हात धावून आले आहेत. मीनाक्षी हॉस्पिटलचे डॉ. प्रताप गोळे यांनी रुग्णाची गरज ओळखून एअर बेड आणि एक महिना पुरेल एवढा औषधांचा साठा अशा दहा हजार रुपये किमतीच्या वस्तू आकाशला मदत म्हणून दिल्या आहेत.
आकाशला सध्या ‘बेडरेस्ट’ घेणे गरजेचे आहे. त्याच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर विश्रांतीसाठी ‘एअर बेड’ आवश्यक असल्याचे सांगितले. ‘एअर बेड’ची किंमत जास्त आहे. तो खर्च कमी व्हावा आणि आजारपणात रुग्णाला आधार देणारी एखादी वस्तू दिली तर ते अधिक चांगले, या उद्देशाने आकाशला एअर बेड आणि एक महिन्याची औषधे दिली, असे डॉ. गोळे यांनी सांगितले.
‘घनतिमिरी दिसेना वाट... कुटुंब शोधतेय कवडसा’ या शीर्षकाखाली दि. १४ च्या ‘लोकमत’मध्ये आकाशच्या आजाराविषयी आणि कुटुंबाच्या झालेल्या कोंडीविषयी वृत्तांत प्रसिद्ध झाला होता. खेळण्या-बागडण्याच्या वयात मेंदूत ताप गेल्याने आकाश अंथरुणाला खिळला. त्याच्या उपचारांसाठी प्रचंड खर्च होणार असल्याने आणि येवले कुुटुंबाची तशी परिस्थिती नसल्याने त्याचे आईवडील प्रचंड तणावाखाली होते.
‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच दानशूरांचे असंख्य हात पुढे आले. सर्व स्तरातील लोकांनी आपापल्या परीने आकाशला केली. शाळकरी मुलांनीही खाऊचे पैसे आकाशसाठी दिले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पॉकेटमनीमधून पैसे दिले. आता त्याच्या उपचारास लागणारी बहुतांश रक्कम येवले कुटुंबीयांकडे जमा झाली आहे.
मीनाक्षी हॉस्पिटलतर्फे डॉ. राहुल साळुंखे यांच्या हस्ते ही मदत प्रदान करण्यात आली. त्यांच्याा बरोबर मीनाक्षी मेडिकलचे जितेंद्र साळुंखे आणि मीनाक्षी डायग्नोस्टिक सेंटरचे प्रदीप पालकर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आकाशच्या वडिलांकडे एअर बेड आणि एक महिना पुरतील एवढी औषधे दिली.
आकाशच्या उपचारांना पुरेल एवढी रक्कम आता जमा झाली असून, ‘लोकमत’च्या पुढाकाराने आकाशचे आईवडील आता तणावमुक्त झाले आहेत. आकाश बरा होऊन खेळू लागेल, अशी आशा त्यांना वाटू लागली आहे. (प्रतिनिधी)

आकाशचे वडील ड्रायव्हर आहेत. आमच्यासारखंच कुटुंब आहे आकाशचं. अशा कुटुंबाची आर्थिक ओढाताण आम्हाला समजते. आम्ही ती जवळून पाहिली आहे. अशा परिस्थितीत गंभीर आजार झाल्यास कुटुंबाची मनस्थिती कशी होते, हे आम्ही जाणतो. त्यामुळेच आकाशची परिस्थिती पाहून आम्ही भाजीवाल्यांनी त्याच्यासाठी मदत गोळा केली.
- गायत्री माने, भाजी विक्रेती

Web Title: Light of the sky on the sky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.