गडहिंग्लज परिसरात हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:30+5:302021-01-08T05:21:30+5:30
-------------------------------------- * महागावातही पाऊस महागाव : महागाव (ता. गडहिंग्लज) परिसरात दुपारच्या सुमारास हलका पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. ...

गडहिंग्लज परिसरात हलक्या सरी
--------------------------------------
* महागावातही पाऊस
महागाव : महागाव (ता. गडहिंग्लज) परिसरात दुपारच्या सुमारास हलका पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. कोरोनामुळे बंद असलेला सोमवारचा आठवडा बाजार पहिल्यांदाच भरला होता. मात्र, या पहिला बाजारावरही पावसाने कृपादृष्टी केल्याने व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाली. ढगाळ वातावरण व पावसामुळे आंब्याच्या मोहोराला फटका बसणार आहे.
--------------------------------------
ढगाळ वातावरण व पावसाचा काजू मोहोरला फटका
आजरा : आजरा तालुक्यात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण व पडलेल्या पावसाने जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे काजू व आंबा मोहोरावर किडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. सध्या आजरा तालुक्यात गवत कापणी सुरू आहे. रविवारपासून ढगाळ वातावरण व सोमवारच्या अवकाळी पावसाने गवत भिजले आहे. फुललेला काजू व आंब्याचा मोहोर गळून पडणार आहे. याचा फटका १० ते १५ टक्के बसणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. पावसाने गवत भिजल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. ऊसतोड व ऊस वाहतुकीवरही याचा परिणाम होणार आहे. पावसाने अनेक ठिकाणची उसाची तोंड थांबविण्यात आली आहे.