कोल्हापुरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST2021-06-24T04:17:14+5:302021-06-24T04:17:14+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०.३ मिलिमीटर पावसाची नोंद ...

Light showers with cloudy weather in Kolhapur | कोल्हापुरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी

कोल्हापुरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गेली चार दिवस पावसाने उसंत घेतली आहे. कडकडीत ऊन राहिल्याने शेतीच्या कामांना काहीसा वेग आला आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असून राधानगरी धरणातून मात्र अद्याप वीजनिर्मितीसाठी प्रतिसेंकद १३०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस असा- शाहूवाडी -१.७, गगनबावडा -१०.३, करवीर - १.२, कागल - ०.४, गडहिंग्लज - ०.२, भुदरगड - ०.१. इतर तालुक्यात पावसाची पूर्णपणे उघडीप राहिली.

Web Title: Light showers with cloudy weather in Kolhapur