कोरोना रुग्णांना जीवदान देेणारे संजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:28+5:302021-07-04T04:17:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : कोरोना महामारी काळात जिल्ह्यामधील आरोग्य विभाग लढाई लढत आहे. यामध्ये अनेक डॉक्टर्स दिवसरात्र ...

कोरोना रुग्णांना जीवदान देेणारे संजीवन
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : कोरोना महामारी काळात जिल्ह्यामधील आरोग्य विभाग लढाई लढत आहे. यामध्ये अनेक डॉक्टर्स दिवसरात्र कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहेत. संजीवन कोरोना केअर सेंटर या शासकीय कोरोना केअर सेंटरचे व्यवस्थापक डॉ. अभिजित जाधव यांनी आपल्या सेवेने आत्तापर्यंत अनेक रुग्णांना बरे केले आहे. त्यांच्या या विशेष सेवेचे कौतुक वारणा परिसरासह पन्हाळा तालुक्यात होत आहे.
कोरोनामधून जीवदान मिळालेल्या दिगवडे गावच्या ऋषीकेश गुंड व इतर तरुणांनी डॉक्टरांप्रती आभार म्हणून डॉ.अभिजित जाधव यांचा संजीवन कोरोना केअर सेंटरमध्ये सत्कार करण्यात केला. डॉ.जाधव यांनी वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच सामाजिक कार्यातदेखील पुढे आहे.
आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या कोरोना बाधितांनी मोफत अशा शासकीय कोरोना केअर सेंटरमधे उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ.अभिजित जाधव यांनी केले.
.............................
फोटो ओळी -पन्हाळा तालुक्यातील संजीवनी कोरोना केअर सेंटरचे डॉ.अभिजित जाधव (बहिरेवाडी ) यांचा सत्कार बरे झालेले कोरोना रुग्ण व नातेवाइकांनी केला.