पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबूतरास जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 01:42 PM2020-10-15T13:42:21+5:302020-10-15T13:45:09+5:30

Muncipal Corporation, kolhapurnews, kite, pigeones संभाजीनगर बसस्थानकाजवळील विजयनगरमध्ये निलगिरीच्या झाडावर पतंगाच्या मांज्यात एक कबूतर अडकले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत त्याची सुखरूप सुटका केली.

Life for a pigeon trapped in a moth's nest | पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबूतरास जीवदान

कोल्हापुरातील संभाजीनगर बसस्थानकाशेजारी असणाऱ्या विजयनगरमध्ये निलगिरीच्या झाडावर पतंगाच्या दोऱ्यामध्ये अडकलेल्या कबूतराची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.

Next
ठळक मुद्देपतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबूतरास जीवदान अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

कोल्हापूर : संभाजीनगर बसस्थानकाजवळील विजयनगरमध्ये निलगिरीच्या झाडावर पतंगाच्या मांज्यात एक कबूतर अडकले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत त्याची सुखरूप सुटका केली.

विजयनगर भागातील नागरिक सुरेश फडतारे यांनी आपल्या घराजवळील निलगिरीच्या झाडावर पतंगाच्या मांज्यामध्ये कबूतर अडकल्याची माहिती नगरसेविका दीपा मगदूम यांना दिली. त्यांनी ही बाब अग्निशमन दलास कळविली.

छत्रपती राजाराम टिंबर मार्केट येथे असणाऱ्या फायर स्टेशनमधील अग्निशमन दलाचा एक बंब जवानांसह तत्काळ तेथे दाखल झाला. निलगिरीचे झाड उंच असल्याने तेथपर्यंत पोहोचणे अशक्य होते. तत्काळ बूम वाहन मागविण्यात आले. अथक परिश्रमांनंतर या कबूतराचा जीव वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
 

Web Title: Life for a pigeon trapped in a moth's nest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.