शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून जन्मठेपेतील कैद्याचे पलायन, शोधमोहीम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:24 IST

प्रेयसीच्या मदतीने तिच्या नवऱ्याचा केला होता खून

कोल्हापूर : प्रेयसीच्या मदतीने तिच्या नवऱ्याचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी सुरेश अप्पासो चोथे (वय ३८, मूळ रा. चोथेवाडी, ता. गडहिंग्लज) हा कळंबा कारागृहाबाहेरील कार वॉशिंग सेंटरवरून ग्राहकाची कार घेऊन पळून गेला. हा प्रकार गुरुवारी (दि. २४) दुपारी तीनच्या सुमारास घडला. पोलिसांकडून शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी करून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही.जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, कैदी क्रमांक ३८६ सुरेश चोथे हा ऑगस्ट २०२२ पासून कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तो सध्या खुल्या कारागृहात होता. त्यामुळे त्याला कारागृहाबाहेरील कार वॉशिंग सेंटरवर कामाची जबाबदारी दिली होती. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तो एका कारची स्वच्छता करीत होता.स्वच्छ केलेली कार बाजूला लावण्याच्या निमित्ताने तीच कार (एम एच ०९ जी ए २१६१) घेऊन तो निघून गेला. हा प्रकार लक्षात येताच कारागृह पोलिसांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रात्री उशिरा याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी करून कैद्याचा शोध सुरू केला.

तक्रार देण्यास उशीरकैदी पळाल्याची घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देणे गरजेचे होते. मात्र, रात्री दहाच्या सुमारास कारागृह पोलिसांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली. कारागृह प्रशासनाने कैदी पळाल्याची माहिती वेळेत दिली असती तर, त्याचा तातडीने शोध घेता आला असता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भडगाव येथील खून प्रकरणात शिक्षा सुरेश चोथे याने नोव्हेंबर २०१७ मध्ये भडगाव येथे प्रेयसीच्या मदतीने तिच्या शिक्षक पतीचा खून केला होता. त्यानंतर दोघांनी मिळून शिक्षकाचा मृतदेह अंबोली येथील कावळेसाद दरीत फेकला होता. त्या गुन्ह्यात सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने चोथे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ऑगस्ट २०२२ पासून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता.