शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: बालकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप, पैशाच्या वादातून गेला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 12:57 IST

आईच्या हातचा चहा घेतला..मुलाचा घात केला.

कोल्हापूर : नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खून करून येथील रंकाळा खाणीत टाकल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने विश्वास बंडा लोहार (३०, रा. तिसंगीपैकी मुसलमानवाडी, ता. गगनबावडा) यास मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी ही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ५ नोव्हेंबर २०१७ रोजी पन्हाळा तालुक्यातील मरळी येथील प्रदीप सरदार सुतार (९) याचा खून विश्वास याने उसने पैसे मागितल्याच्या रागातून केला होता.मरळी येथील सरदार तुकाराम सुतार आणि आरोपी विश्वास नात्याने मावस भाऊ आहेत. सरदार यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यांनी विश्वासला घर बांधण्यासाठी ४० हजार रुपये हातउसने दिले होते. दरम्यान, सरदार यांच्या भावाचा अपघात झाल्याने त्यांना पैशांची गरज निर्माण झाली. त्यामुळे उसने दिलेले पैसे दे, अशी मागणी विश्वास यांच्याकडे त्यांनी केली. पण, तो उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ करीत राहिला. तू‘सारखे पैसे मागताेय बघतो मी काय करायचे ते ’ अशी धमकी दिला होती. त्यानंतर सरदार यांच्या घराच्या दारासमोरून मुलगा प्रदीपला विश्वास घेऊन गेला. प्रदीप सायंकाळी साडेसहा वाजले तरी घरी परतला नाही. त्याची शोधाशोध सुरू झाली. काही ग्रामस्थांनी प्रदीपला घेऊन विश्वास रंकाळा बसस्थानकात आल्याचे सांगितलेे. तेथे आरोपी विश्वास एकटाच सापडला. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर दोन दिवसांनी प्रदीपचा मृतदेह रंकाळा खाणीत तरंगताना मिळाला. यामुळे प्रदीपचे अपहरण करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी २२ साक्षीदार तपासले. आरोपी विश्वास यास तीन कलमांखाली प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, एका कलमाखाली सात वर्षे तर दुसऱ्या कलमाखाली दहा वर्षे सक्त मजुरी आणि खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेचे शिक्षा झाली.

आईच्या हातचा चहा घेतला..मुलाचा घात केला.सरदार यांच्या घरी घटनेच्या आदल्यादिवशी विश्वास आला होता. त्यावेळी सरदार यांच्या पत्नीने त्यास चहा करून दिला. चहा पिऊन घरासमोर विश्वास बसला. त्यावेळी प्रदीप घरासमोर खेळत होता. तेथून तो प्रदीपला घेऊन गेला आणि त्याचा विश्वासने घात केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय