लायसेन्स होणार नाही रद्द, ३० तारखेपर्यंत सर्वच कामे होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:42+5:302021-09-22T04:28:42+5:30
स्टार डमी १२०२ ....नियोजनातील विषय लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : मुदत संपलेल्या लर्निंग लायसेन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यासह अन्य ...

लायसेन्स होणार नाही रद्द, ३० तारखेपर्यंत सर्वच कामे होणार पूर्ण
स्टार डमी १२०२ ....नियोजनातील विषय
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : मुदत संपलेल्या लर्निंग लायसेन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यासह अन्य कामांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे; मात्र कोटा फुल्ल झाला असला तरी कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने लायसेन्सचा कोटा वाढविला आहे. त्यामुळे लायसेन्स बाद होण्याची शक्यता कमी आहे. या कालावधीत वाहनधारकांनी अशा मुदत संपलेल्या कामाकरिता त्वरित ऑनलाईन अपाॅईंटमेंट घेणे गरजेचे आहे.
नवोदित वाहनधारकांनी लर्निंग लायसेन्सकरिता ऑनलाईन अपाॅईंटमेट घेतली आहे; मात्र, कोरोनाच्या सलग दोन लाटांमुळे हा विभाग काही काळ बंद होता. त्यामुळे ज्यांनी अपाॅईंटमेट घेतली होती, त्यांना ती पुढे वाढवून मिळाली. या काळात कोटा फुल्ल झाला. त्यामुळे ज्यांना ही अपाॅईंटमेट मिळाली नाही, त्यांना लायसेन्स बाद होईल की काय, अशी चिंता लागली. या काळात अवजड व मालवाहतुकीच्या वाहनांचे पासिंग, फिटनेस प्रमाणपत्रही रखडले होते. कोरोनामुळे परिवहन कार्यालयातही काही कामांबाबत निर्बंध होते. वाहनधारकांना थेट कार्यालयात प्रवेश नव्हता. जी ऑनलाईन व घरातून मोबाईलवरून कामे असतील, ती करता येत होती. अशा सर्व कामांकरिता ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली होती.
अडचणी काय आहेत?
अनेकजणांना ऑनलाईन अपाॅईंटमेट घेताना अडचणी येत आहेत. कोटा फुल्ल झाल्यामुळे लर्निंग लायसेन्ससाठी स्लाॅट मिळत नाही. याशिवाय पासिंगसाठीही तारखेचा स्लाॅट मिळेनासा झाला आहे. अशा काहीअंशी तक्रारी आहेत.
रोजचा कोटा वाढविला
रोज लर्निंग लायसेन्ससाठी १२० ते १२५ इतका नियमित आहे. ३० सप्टेंबरची मुदतवाढ मिळाल्यामुळे या काळात परिवहन कार्यालयाने वाहनधारकांची गैरसोय व लायसेन्स बाद होऊ नयेत, याकरिता दिवसाकाठी ३०० च्या वर केला आहे. त्यामुळे लर्निंग लायसेन्स काढणाऱ्यांची सोय होत आहे. गरज ओळखून ही मुदतही वाढण्याची शक्यता आहे.
लायसेन्स नव्याने काढावे लागणार की काय?
माझ्या लायसेन्सची मुदत संपली होती. मला कोटा संपल्यामुळे ऑनलाईन अपाॅईंटमेट मिळत नव्हती; मात्र कोटा वाढविल्यामुळे मला अपाॅईंटमेट मिळाली. मुदतवाढ आणि कोटा वाढविला नसता तर माझे लायसेन्स बाद झाले असते.
- प्रभाकर भोसले, कोल्हापूर
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शासनाने ३० सप्टेंबरनंतरही मुदतवाढ द्यावी. जेणेकरून लर्निंग अथवा पासिंग, फिटनेस प्रमाणपत्र, आदी कामे पूर्ण होतील.
- विजय पोवार, कोल्हापूर
कोट
शनिवारी व रविवारीही आरटीओचे कॅम्प सुरू केले आहेत. याशिवाय कोटाही ३००च्या आसपास नेला आहे. कॅम्पमध्येच दोन हजारांचा कोटा केला आहे. त्यामुळे नागरिक लायसेन्सपासून वंचित राहणार नाहीत.
रोहित काटकर,
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर
...............