सुसंस्कारासाठी वाचनालयांनी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:12+5:302021-09-08T04:31:12+5:30
कार्यवाह वसंतराव पाटील यांनी स्वागत केले. यावेळी डॉ. मांजरेकर व मृणालिनी मांजरेकर यांचा अजितसिंह शिंदे व संयोगितादेवी ...

सुसंस्कारासाठी वाचनालयांनी पुढे यावे
कार्यवाह वसंतराव पाटील यांनी स्वागत केले. यावेळी डॉ. मांजरेकर व मृणालिनी मांजरेकर यांचा अजितसिंह शिंदे व संयोगितादेवी शिंदे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, ग्रंथ व रोख रकमेचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी टीव्ही नाईन मराठी न्यूज चॅनेलसाठी निवड झाल्याबद्दल संदीप राजगोळकर यांचा तर ज्येष्ठ नागरिक म्हमुलाल नूलकर, धोंडिबा पाटील गुरुजी यांच्यासह कोरॉना योध्ये डॉ. टी. एच. पाटील, डॉ. किरण सूर्यवंशी, डॉ. मंगल सूर्यवंशी, डॉ. विश्वजित शिंदे, डॉ. डिसोझा, डॉ. सत्यजित शिंदे, डॉ. श्रीनिवास कातकर, डॉ. अभय आरभावी, बसवराज गुंजाठी तसेच बाजारपेठ रुंदीकरणासठी स्वतःहून पुढाकार घेतलेले व्यापारी बसवराज कोरी, बसवराज गाडवी, शिवा कोरी यांचा डॉ. मांजरेकर यांच्या हस्ते गौरव केला. यावेळी प्रा. डॉ. एस. डी. पाटील, संदीप राजगोळकर, डॉ. टी. एच. पाटील, डॉ. सत्यजित देसाई, कवी राजाराम आळवी यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी एस. एन. राजगोळकर यांनी वाचनालयास ५००० रु. देणगी दिली. अशोक आरभवी संचालक शिवाजीराव पाटील, आप्पसो कुंभार, चंद्रकांत वणकुंद्रे, विठ्ठल नाईक यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.