पंधरा जणांना दिली पोलीस शिपाई नियुक्तीची पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:37+5:302021-05-07T04:25:37+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलात गुरुवारी अनुकंपा तत्त्वाखालील उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार १५ ...

पंधरा जणांना दिली पोलीस शिपाई नियुक्तीची पत्रे
कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलात गुरुवारी अनुकंपा तत्त्वाखालील उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार १५ उमेदवारांची पोलीस शिपाईपदी नियुक्त करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी उमेदवारांना दिले.
पोलीस दलात कर्तव्यावरील एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाइकांना पोलीस दलाच्या सेवेत सामावून घेतले जाते. कोल्हापूर पोलीस दलात कर्तव्य बजावताना मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना अनुकंपा तत्त्वाखालील भरती प्रक्रिया गुरुवारी राबविण्यात आली. त्यानुसार पोलीस शिपाई प्रतीक्षा यादीमधील ज्येष्ठतेनुसार ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कोल्हापुरातील उमेदवारांना पोलीस शिपाई पदावर नियुक्त केली. त्याबाबतचे पत्र पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी उमेदवारांना दिले. अनुकंपा तत्त्वावरील भरती झालेल्यांमध्ये रोहन कुलकर्णी, कुणाल घाटगे, छाया खंडागळे, शुभम घाटगे, प्रवीण वगरे, प्रतीक जाधव यांच्यासह १५ जणांचा समावेश आहे.