सर्व खेळ पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील राहू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:14+5:302021-09-26T04:27:14+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थगित असलेल्या सर्व खेळ शासनाच्या नियमानुसार पूर्ववत सुरू करण्यासाठी खेळांशी संबंधित घटक व ...

Let's try to undo all the games | सर्व खेळ पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील राहू या

सर्व खेळ पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील राहू या

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थगित असलेल्या सर्व खेळ शासनाच्या नियमानुसार पूर्ववत सुरू करण्यासाठी खेळांशी संबंधित घटक व आपण सर्व जण प्रयत्नशील राहू या, असे आवाहन कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनचे (केएसए) अध्यक्ष मालोजीराजे यांनी शनिवारी केले.

मालोजीराजे म्हणाले, खेळ पूर्ववत सुरू करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून केएसएच्या फुटबाॅल संघातील खेळाडूंना लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. खेळाडूंची शारीरिक व मानसिक क्षमता वाढविण्यासाठी ऑनलाइन तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिरही झाले आहे. कोल्हापूर साॅकर रेफ्री असोसिएशनच्या १८ पंचांना २ लाख ५ हजारांचे अर्थसाहाय्य केले आहे. संस्थेचे पेट्रन-इन-चिफ शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त जिम्नॅस्टिकसाठी साहित्यही मिळाले आहे. यासह क्रीडा अधिकारी कार्यालयाने टेबल टेनिस विभागासाठी चार आंतरराष्ट्रीय दर्जाची टेबल दिल्याची माहिती दिली. संस्थेच्या वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, अंदाजपत्रक २०२१-२२ यांना मंजुरी देण्यात आली. लंडन येथील रिजेन्टस विद्यापीठातून पदवी प्राप्त करणाऱ्या कोल्हापूर संस्थानच्या पहिल्या राजकन्या ठरल्याबद्दल यशस्विनीराजे यांच्यासह ऑलिम्पिकमधील पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्षपदी अरुण नरके, व्यंकटेश घाटगे, मानसिंग जाधव यांची, तर ऑडिटर म्हणून अमोल पवार यांची नेमणूक करण्यात आली. सभेस पेट्रन व गर्व्हनिंग कौन्सिल सदस्य खासदार संभाजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे व अन्य पदाधिकारी, सदस्य, सभासद उपस्थित होते. मानद सरचिटणीस माणिक मंडलिक यांनी आभार मानले.

फोटो : २५०९२०२१-कोल-केएसए

ओळी : कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या शनिवारी झालेल्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मालोजीराजे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Let's try to undo all the games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.