नगरपालिका कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:01+5:302021-06-30T04:17:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य नगरपालिका कर्मचारी, संवर्ग कामगार संघटनेच्या वतीने पालिकेच्या कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वारंवार ...

नगरपालिका कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावू
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य नगरपालिका कर्मचारी, संवर्ग कामगार संघटनेच्या वतीने पालिकेच्या कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वारंवार पाठपुरावा सुरू होता. कोरोना महामारीमुळे निर्णय घेण्यास अडचणी येत होत्या. अखेर पालिका कर्मचा-यांच्या प्रलंबित सोळा मागण्या त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
नगरपालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने नगरपालिका कर्मचा-यांचा कोषागारमधून वेतन होणे, डीसीपीएस/ एनसीपीएस अंतर्गत सेवानिवृत्त अंशदान लागू करणे. सेवार्थ आयडी खाते सुरू करून रक्कम जमा करणे. मुख्य अधिकारी यांची ३० टक्के पदे प्रमोशनने भरणे. तसेच अपात्र स्वच्छता निरीक्षक यांची त्रुटी दूर करून समावेशन करणे. नगरपंचायत कर्मचा-यांचे सरसकट समावेशन करणे. कर्मचायांचे ७ वा वेतन आयोग थकीत फरक रक्कम अदा करणे. सुधारित आकृतीबंध लागू करणे. १०,२०,३० सुधारित आश्वासीत प्रगती योजना लागू करणे, या मागण्या केल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागण्यांसंदर्भात दिरंगाई होत होती. त्यामुळे पालिका कर्मचा-यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, मंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी नगरपालिका कर्मचा-यांच्या मागण्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.