बुबनाळचा पाणीप्रश्न मार्गी लावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:24+5:302021-07-18T04:18:24+5:30
बुबनाळ : बुबनाळमधील रखडलेल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली. बुबनाळ (ता. ...

बुबनाळचा पाणीप्रश्न मार्गी लावू
बुबनाळ : बुबनाळमधील रखडलेल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली.
बुबनाळ (ता. शिरोळ) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार खोत बोलत होते. या वेळी आमदार खोत यांच्या फंडातून पाणवठा घाट व रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचा प्रारंभ या वेळी करण्यात आला.
या वेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, नगरसेवक डॉ. अरविंद माने, श्रीवर्धन माने, आकाश राणे, अल्ताफ मुल्ला, सरपंच सारिका राजमाने, उपसरपंच भरत मरजे, ग्रा. पं. सदस्य सुभाष शहापुरे, नेमिनाथ ऐनापुरे, पुंडलिक कबाडे, मल्लाप्पा ऐनापुरे, असीम जमादार, अर्जुन केरीपाळे, बापुसो ऐनापुरे उपस्थित होते.
-------------
चौकट - अन्यथा ठेकेदारावर गुन्हा
बुबनाळ पेयजल योजनेचा रखडलेल्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठामंत्र्यांना पत्रव्यवहार करणार आहे. योजना लवकर पूर्ण झाली नाही तर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले.