आर्थिक भार न पडणाऱ्या मागण्या निश्चित मार्गी लावू : मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:44+5:302021-07-04T04:17:44+5:30
कोल्हापूर : आर्थिक भार न पडणाऱ्या मागण्या निश्चित मार्गी लावू व मंत्रालय स्तरावर चर्चेसाठी वेळ देऊ, असे आश्वासन ग्रामविकास ...

आर्थिक भार न पडणाऱ्या मागण्या निश्चित मार्गी लावू : मुश्रीफ
कोल्हापूर : आर्थिक भार न पडणाऱ्या मागण्या निश्चित मार्गी लावू व मंत्रालय स्तरावर चर्चेसाठी वेळ देऊ, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना शनिवारी दिले.
महाराष्ट्र राज्य जि. प. लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, कोल्हापूर जिल्हा शाखेने शनिवारी सकाळी मुश्रीफ यांची त्यांच्या कागल येथील निवासस्थान भेट देऊन मागण्याचे निवेदन दिले.
निवेदनात केलेल्या मागण्या अशा, मंत्रालय स्तरावर चर्चेसाठी वेळ मिळावी, वरिष्ठ सहायक पदोन्नती टक्केवारी (पदोन्नती ७५ टक्के स्पर्धा २५ टक्के) वाढवावी व MDS मध्ये लिपिकांची टक्केवारी वाढवावी, वर्ग ४ मधून लिपिक पदावर पदोन्नती झालेल्या कर्मचारी यांना पदोन्नती पूर्वी आ. प्र. योजनेचा पहिला लाभ देताना हवालदार ऐवजी कनिष्ठ सहायक ची वेतनश्रेणी द्यावी. नियमितपणे स्पर्धा परीक्षा घेणेत याव्यात, २००८ पूर्वी आगाऊ वेतनवाढ मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ व फरक देण्यात यावा, अशा मागण्या केल्या, यावर म्हणणे ऐकून घेतल्यावर मुश्रीफ यांनीही आर्थिक भार न पडणाऱ्या मागण्या निश्चित मार्गी लावू व मंत्रालय स्तरावर चर्चेसाठी वेळ देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी लिपिक संघटना राज्य कार्याध्यक्ष सचिन मगर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नीलेश म्हाळुंगेकर, उपाध्यक्ष भालचंद्र माने, सचिव फिरोज खान फरास, अश्विन दारवाडकर, शैलेश पाटणकर, नागेश खोत, दिनकर घुले, उदय कुलकर्णी, बाबूराव कात्रे, दत्तात्रय निकम, बजरंग बराले, साताप्पा पाटील, आनंदा बारड, अण्णा कोरवी, महादेव माने व इतर लिपिक संघटनाचे लिपिक उपस्थित होते.
चौकट
मुश्रीफ यांचा सत्कार
शिव स्वराज्य दिन साजरा करण्यासाठी परिपत्रक काढून अंमलबजावणी केल्याबद्दल संघटनेच्यावतीने मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.
शाहू पुरस्कार विजेत्यांचा सत्कार
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल अधीक्षक अमित माळगे व कनिष्ठ सहायक अमर माळी यांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.