खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:41+5:302021-01-23T04:25:41+5:30

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हणून खंडपीठ ...

Let's meet the Chief Minister for the bench | खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ

खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हणून खंडपीठ व्हावे, यासाठी वकिलांसह पक्षकारही लढा देत आहेत. लाॅकडाऊनपूर्वी हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानांवर विषय घातला होता. तोपर्यंत कोरोना महामारीला सुरुवात झाली. त्यानंतर आता पुन्हा या प्रश्नी १५ दिवसांत भेट घेऊन विषयच मार्गी लावू.

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, खंडपीठासाठी लागणारी इमारत, लायब्ररी, विमानतळ, अशी सर्व साधनसामग्री येथे उपलब्ध आहे. अन्य अडथळे दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू.

बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रणजित गावडे म्हणाले, नवोदित वकील ज्ञानाने समृद्ध व्हावेत यासाठी वर्षभरात प्रयत्न करून हे अद्ययावत ग्रंथालय उभे केले आहे. न्यायालयीन कामकाज ऑनलाईन पद्धतीने समजावे, याकरिता ई-लर्निंग सेंटरची स्थापना केले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ आडगुळे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची भेट घेऊन खंडपीठासाठी मनधरणी केली तरच हा प्रश्न मार्गी लागेल.

यावेळी महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे, ज्येष्ठ विधिज्ञ शिवाजीराव राणे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजित मोहिते, प्रकाश माेरे, उपाध्यक्ष जयेंद्र पाटील, सचिव गुरुप्रसाद माळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. शिल्पा सुतार यांनी आभार मानले.

फोटो : २२०१२०२१-कोल-कोर्ट ०२

ओळी : कसबा बावड्यातील कोल्हापूर जिल्हा न्यायालयात जिल्हा बार असोसिएशनतर्फे ग्रंथालय नूतनीकरण, ई लर्निंग सेंटरचे उद‌्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, ॲड. विवेक घाटगे, ॲड. रणजित गावडे, ॲड. विवेक शुक्ल, ॲड. धनंजय पठाडे, आदी मान्यवर उपस्थित होते. (छाया नसीर अत्तार)

Web Title: Let's meet the Chief Minister for the bench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.