तासात कोल्हापूर प्लास्टिक कचरामुक्त करूया- अर्थ वाॅरियर्सचा २३ ला उपक्रम : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST2021-02-20T05:10:36+5:302021-02-20T05:10:36+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्राचे लोकसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. २३) कोल्हापूर अर्थ वाॅरियर्सतर्फे ‘एका तासात आपले कोल्हापूर प्लास्टिक कचरामुक्त ...

तासात कोल्हापूर प्लास्टिक कचरामुक्त करूया- अर्थ वाॅरियर्सचा २३ ला उपक्रम : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त
कोल्हापूर : महाराष्ट्राचे लोकसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. २३) कोल्हापूर अर्थ वाॅरियर्सतर्फे ‘एका तासात आपले कोल्हापूर प्लास्टिक कचरामुक्त करुया’ हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती संस्थेचे संयोजक सुबोध भिंगार्डे यांनी दिली. हे अभियान सकाळी ८ ते ९ या दरम्यान राबवले जाणार आहे.
त्यामध्ये प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, केईडब्ल्यूचे सर्व स्वयंसेवक, तरुण मंडळे, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आदी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत. शहराचे तीस भाग केले आहेत. त्यात १०० ते १५० संकलन केंद्रे उभी केली जाणार आहेत. या दिवशी शहरातील विविध ठिकाणी सहयोगी सदस्य उभे राहणार आहेत. त्यांच्याकडे सर्वजण असा प्लास्टिक कचरा नेऊन देतील. हे सहयोगी सदस्य तो पोत्यात भरतील. नऊ वाजल्यानंतर गोळा केलेली पोती महापालिका प्रशासन या केंद्रावरून गोळा करून ते पुनर्निर्मितीसाठी पाठविणार आहे. सध्या या संस्थेचे दोनशे सभासद असून, ते पर्यावरण जागृतीसाठी झटत आहेत. प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी ईको-ब्रीक्सचा उपक्रम त्यांच्याकडून राबविला जात आहे. या उपक्रमात जास्तीत-जास्त लोकांनी सहभाग होऊन अभियानाचा योग्य प्रसार करावा, अशी विनंतीही भिंगार्डे यांनी केली आहे. विजय सावंत, युवराज गुरव, सीए अभिजित कुलकर्णी, आशिष कोंगळेकर, तात्या गोवावाला, परितोष उरकुडे, प्रमिला बत्तासे, तृप्ती देशपांडे, आदिती गर्गे आदींनी या मोहिमेत पुढाकार घेतला आहे.