देसाई विद्यामंदिर शाळेला आदर्श बनवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:22 IST2021-03-15T04:22:43+5:302021-03-15T04:22:43+5:30

उदगाव : जिल्ह्यातील पहिल्याच शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या देसाई विद्यामंदिर या जिल्हा परिषदेच्या शाळेस मॉडेल शाळा बनवूया. त्यासाठी भरघोस ...

Let's make Desai Vidyamandir school ideal | देसाई विद्यामंदिर शाळेला आदर्श बनवू

देसाई विद्यामंदिर शाळेला आदर्श बनवू

उदगाव : जिल्ह्यातील पहिल्याच शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या देसाई विद्यामंदिर या जिल्हा परिषदेच्या शाळेस मॉडेल शाळा बनवूया. त्यासाठी भरघोस निधी देऊन शाळा आदर्श बनविण्यासाठी सदैव कार्यरत राहू, असे प्रतिपादन जि. प. समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांनी केले. उदगाव (ता. शिरोळ) येथील देसाई विद्यामंदिरमध्ये ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील कोळी यांनी केले. यावेळी शिक्षक व पालक यांच्या लोकवर्गणीतून घेतलेल्या खेळाच्या साहित्य प्रदान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नूतन सरपंच कलीमून नदाफ यांनी शाळेचे पट वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान करत शाळेच्या भौतिक सुविधांसाठी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.

याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, शालेय समितीचे अध्यक्ष पांडुरंग ठोमके, माधुरी बन्ने, प्रकाश बंडगर, सुरेखा पाटील, कल्पना पाटील, राजू राठोड, गणेश कुरे, संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रिया कोले यांनी आभार मानले.

फोटो - १४०३२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - उदगाव (ता. शिरोळ) येथील देसाई विद्यामंदिर शाळेस खेळाचे साहित्य प्रदान करण्यात आले.

Web Title: Let's make Desai Vidyamandir school ideal