चला शिकूया गमतीशीर विज्ञान
By Admin | Updated: May 6, 2015 00:24 IST2015-05-06T00:13:38+5:302015-05-06T00:24:48+5:30
‘लोकमत बालविकास मंच’तर्फे आयोजन

चला शिकूया गमतीशीर विज्ञान
कोल्हापूर : आपल्या अवतीभोवती अनेक वस्तू असतात. त्यांच्या माध्यमातून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ््यासमोर ठेवून अनेक वैज्ञानिक प्रयोग करू शकतो. मात्र, हे आपल्याला माहीतच नसते, हेच वैज्ञानिक प्रयोगांचे धडे देण्यासाठी ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे ‘गमतीशीर विज्ञान’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक ९ मे रोजी दोन गटांत ही कार्यशाळा होणार आहे. ८ ते १२ वर्षांसाठी ‘अ’ गट, तर १३ ते १६ वर्षांसाठी ‘ब’ गट करण्यात आले आहेत.
कार्यशाळेत ‘अ’ गटासाठी : मॅजिक रायटिंग, पिक्चर प्रोजेक्टर, वॉटर टर्बाईन, फाउंटन बॉटल, सोडियम मेटल, सेपरेटिंग फ्लास्क, स्वीट फायर, तर ‘ब’ गटासाठी जेट कार, कलरफुल व्होल्कॅनो, वॉटर प्युरिफिकेशन, डान्सिंग सोडियम, स्टीम टर्बाईन यांसह अनेक विज्ञानाचे प्रयोग कार्यशाळेत शिकविले जाणार आहेत. यावेळी दिशा पाटील या मार्गदर्शन करणार आहेत.
बालविकास मंच सभासदांना प्रवेश मोफत, तर इतरांना वीस रुपये प्रवेश फी घेतली जाणार आहे.
तरी इच्छुकांनी दि. ८ मे रोजी सायंकाळी पाचपर्यंत नावनोंदणी करणे गरजेचे आहे. कार्यशाळेला येताना विद्यार्थ्यांनी वही व पेन
सोबत घेऊन येणे. कार्यशाळा
वेळेत सुरू होणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
वसंतप्रभा चेंबर्स, पहिला मजला, इंडसइंड बँकेच्या वर, साइक्स एक्स्टेन्शन, परीख पुलाजवळ. ‘अ’ गटासाठी दुपारी ३ ते ४, तर ‘ब’ गटासाठी दुपारी ४ ते ५ या वेळेत कार्यशाळा होईल.
अधिक माहिती व नावनोंंदणी
‘लोकमत’ कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ७७९८३४४७४४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.