पूरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सरकारला गुडघे टेकायला लावू : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:25+5:302021-08-22T04:27:25+5:30
शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयासमोर शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीतर्फे सुरू असलेल्या पूरग्रस्त आंदोलनस्थळी भेट देऊन माजी खासदार शेट्टी ...

पूरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सरकारला गुडघे टेकायला लावू : राजू शेट्टी
शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयासमोर शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीतर्फे सुरू असलेल्या पूरग्रस्त आंदोलनस्थळी भेट देऊन माजी खासदार शेट्टी यांनी पाठिंबा दिला. यावेळी समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, सुरेश सासणे, दगडू माने, चांद कुरणे, आप्पासाहेब बंडगर, सीताराम भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, प्रत्येक वर्षी शिरोळ तालुक्यावर येणाऱ्या महापूर संकटाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, आम्ही प्रत्येक वर्षी आंदोलन करून तुमच्याकडे भीक मागत बसणार नाही. राज्य सरकारने बारा हजार कोटीचे पॅकेज दिले आहे. मात्र त्यात साडेपाचशे कोटी रुपयांचीच शेतकऱ्यांसाठी तरतूद करून हा शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. तसेच मास्क आणि पीपीई किट खरेदीतही मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी सईद पिरजादे, भाग्यश्री अडसूळ, सतीश चौगुले, राहुल सूर्यवंशी यांच्यासह पूरग्रस्त अन्याय निवारण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. विनोद पुजारी यांनी आभार मानले.
फोटो - २१०८२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ येथील पूरग्रस्तांच्या आंदोलनस्थळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.