राममंदिर निर्माण करण्यासाठी एकत्र येऊया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:32+5:302021-01-08T05:21:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : भारत हा देश संस्कृतीप्रधान आहे. येथील हिंदू धर्माला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या धार्मिक ...

राममंदिर निर्माण करण्यासाठी एकत्र येऊया
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : भारत हा देश संस्कृतीप्रधान आहे. येथील हिंदू धर्माला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या धार्मिक भावनेतून सर्वांनी एकत्र येऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर निर्माण करूया, असे आवाहन प. पू. ईश्वरमहास्वामीजी यांनी केले.
अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्रात मंदिर उभारणीसाठी घरोघरी संपर्क व निधी संकलन अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत हातकणंगले तालुका कार्यालयाचे उद्घाटन इचलकरंजीत झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, हिंदू एकत्र आले, तर त्यांच्यात जग जिंकण्याची ताकद आहे. तीच शक्ती एकत्र करून मंदिर उभारणीचे काम पूर्ण करूया. श्रीराम प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांनी केले. अभियानाची माहिती जिल्हा संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ यांनी दिली. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगरसेवक उदयसिंह पाटील, तेजश्री भोसले, रुपाली कोकणे, मिश्रीलाल जाजू, शिवाजी व्यास, संतोष हत्तीकर, डॉ. राजेश पवार, सनतकुमार दायमा, प्रमोद मिराशी, आदींसह रामभक्त उपस्थित होते. अक्रूर हळदे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब ओझा यांनी आभार मानले.