शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Kolhapur Politics: श्रीकृष्णाची भूमिका घेऊ पण सुदर्शन चक्र कोठून आणू, हसन मुश्रीफांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 15:38 IST

'संजय मंडलिक यांना विजयी करण्याची शपथ घेऊन कामाला लागा'

कोल्हापूर : शाहू छत्रपती यांचे सगळ्यांशी जवळचे संबंध आहेत, पण हे महाभारत आहे. सगेसोयरे विरोधात असले तरी सत्याच्या बाजूने उभे राहून निवडणूक जिंकायची आहे. काहींनी श्रीकृष्णाची भूमिका घेण्यास सांगितले पण, सुदर्शन चक्र कोठून आणू. हे जरी खरे असले तरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संजय मंडलिक यांना विजयी करण्याची शपथ घेऊन कामाला लागा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात रस्त्याचे जाळे विणले असून सामान्य माणसाला सन्मान देण्याची भूमिका घेतली. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करण्याची गरज आहे.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, शाहू छत्रपती हे आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्याविरोधात आम्हाला लढाई करायची नाही. माझे व्यक्तिगत चांगले संबंध आहेत. कोणाचा तरी बळी द्यायचा म्हणून काही मंडळींनी त्यांना भरीस घातले. राजकीय संधीसाधू करणाऱ्यांनी शाहू छत्रपतींचा अपमान केला असून आम्ही गादीचा निश्चितच सन्मान करू, कोणावर टीका करणार नाही, पण ही आत्मसन्मानाची निवडणूक आहे. हसन मुश्रीफ यांना दहा लोकसभा निवडणुकांचा अनुभव असल्याने त्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढविणार असून ते सरसेनापती आहेतच, त्यांच्या श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे विजय निश्चित आहे.बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, रामेश्वर पत्की, आदील फरास यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, रेखा आवळे, परीक्षित पन्हाळकर, महेंद्र चव्हाण, महेश सावंत, रमेश पोवार, राजेश लाटकर, प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, प्रकाश पाटील, प्रकाश कुंभार, सतीश लोळगे, संभाजी देवणे, शारदा देवणे आदी उपस्थित होते. महेश सावंत यांनी आभार मानले.

पांग फेडण्यात पाच वर्षे गेलीमागील निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणून मदत करणाऱ्यांचा पांग फेडण्यात पाच वर्षे गेली. त्यांच्यात नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना निधी देत गेल्याने आपल्याकडे दुर्लक्ष झाले असेल पण आगामी काळात महायुती सोडून कोणाला मदत करणार नसल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.

संचालक परदेश दौऱ्यावर; पदाधिकारी आयोध्यालाजिल्हा बँकेचे संचालक ११ मे पासून परदेश दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगत, याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना अयोध्येच्या दर्शनासाठी पाठवले जाणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

आप्पांचा कानमंत्र आणि मुश्रीफांची साथसकाळीच माजी आमदार महादेवराव महाडीक यांची भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर ‘हसन मुश्रीफ तुमच्यासोबत आहेत ना? त्यांना धरलंय की सगळे व्यवस्थित होते’ असा कानमंत्र त्यांनी दिल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरात आपणच पुढेउमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने प्रचारात विरोधक पुढे असल्याचे सांगितले जाते. पण, हसन मुश्रीफ व धनंजय महाडीक यांच्यामुळे दोन दिवसातच आपण त्यांच्या बरोबरीने गेलो आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सगळे एक असताना जयश्री जाधव यांना ९७ हजार आणि सत्यजीत कदम यांना ७६ हजार मते मिळाली. आता राष्ट्रवादीसह शिवसेना भाजपसोबत असल्याने कोल्हापूर शहरात आपणच पुढे असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४kolhapur-pcकोल्हापूर