रक्ताचे नाही, पाण्याचे पाट वाहू द्या; सुळकूड पाणी योजनेवरुन प्रकाश आवाडेंचा मंत्री मुश्रीफांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 01:13 PM2023-10-17T13:13:33+5:302023-10-17T13:14:04+5:30

लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणे ही दुकानदारी

Let the waters flow, not of blood; Prakash Awad criticizes Minister Mushrif on Sulkood water scheme | रक्ताचे नाही, पाण्याचे पाट वाहू द्या; सुळकूड पाणी योजनेवरुन प्रकाश आवाडेंचा मंत्री मुश्रीफांना टोला

रक्ताचे नाही, पाण्याचे पाट वाहू द्या; सुळकूड पाणी योजनेवरुन प्रकाश आवाडेंचा मंत्री मुश्रीफांना टोला

इचलकरंजी : तुमच्याकडे कोण बघत नाहीत, ते बघावं म्हणून तुम्ही आंदोलन करता. शासनाने योजना मंजूर केली आहे, ती रद्द केली नाही. पाणी देतो म्हणून शासनाने मला विश्वास दिला आहे. मी सुळकूडचे पाणी आणणारच आहे. तरीही मग आंदोलनाची गरज का? मुद्दाम राजकारण सुरू आहे. त्यासाठी घोळका करून काहींनी दुकाने चालू केली आहेत, असा गंभीर आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी कोणाचेही नाव न घेता केला.

येथील घोरपडे नाट्यगृह चौकात ‘इचलकरंजीचा पाणीप्रश्न आणि माझी भूमिका’ या विषयावर आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते.

आवाडे म्हणाले, पाण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी विनंती करूया. तुम्ही आंदोलन केले, तर तेही आंदोलन करतील. तुम्ही शिव्या दिल्या, तर तेही देतील. यातून चर्चेनेच मार्ग काढणे योग्य ठरणार आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मी कागदपत्रे घेऊन पालकमंत्र्यांकडे समजून सांगण्यासाठी जातो. पाण्यासाठी काहीही करतो आणि हा प्रश्न सोडवतो. मात्र, काही मंडळी घोळका करून कायम विरोधात आहेत. हीच मंडळी कृष्णा योजनेवेळी विरोधात होती. ह्यो उलटी गंगा आणायला चाललायं, असे म्हणत होते. आजही तिच परिस्थिती आहे. आवाडेंच्या विरोधात बोलल्याशिवाय यांना जमत नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊया.

सुरुवातीला आयजीएम, संजय गांधी निराधार योजना, कोरोना काळात केलेले काम याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर वस्त्रोद्योगासाठी नक्कीच दिलासादायक काहीतरी करू, असे आश्वासन दिले. प्रकाश दत्तवाडे यांनी स्वागत व राहुल आवाडे यांनी प्रास्ताविक केले. उर्मिला गायकवाड यांनी आभार मानले.

लोकसभा लढवू

ताराराणी पक्ष कसा स्थापन झाला आणि त्याची जडणघडण याबाबत सविस्तर माहिती देऊन आमदार प्रकाश आवाडे यांनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूकही लढवू, अशी तयारी असल्याचे माजी जि. प. सदस्य राहुल आवाडे यांनी सभेमध्ये सांगितले.

बॅलेट मशीन कमी पडेल

सध्या गावात घोळका करून काहीजण एकत्र आले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यावर मी पुढं, काय तू पुढं म्हणून हे सगळे उभारतील. कारण खूपजणांना निवडणूक लढवायची आहे. कदाचित बॅलेट मशीनवर जागा कमी पडेल, असा टोला आवाडेंनी विरोधकांनी लगावला.

पालकमंत्री पाण्याचे पाट वाहू द्या

सण आहे, जरा सबुरीनं घ्या, असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ देतात. मात्र, त्यांच्याकडून रक्ताचे पाट वाहण्याची भाषा येत होती. आमच्याकडून पाण्याचे पाट वाहू द्यात, अशीच भाषा येणार आणि आम्ही सुळकूडमधूनच पाणी आणणार.

फायली का अडवतात?

गावात पाणीसाठा करण्यासाठी सहा नवीन टाक्या शासनाच्या मागे लागून मंजूर करून आणल्या. त्याच्या फायली काहींनी मुंबईत अडविल्या. त्या फायली का अडवतात, हे आता सर्वांना माहीतच आहे, असे म्हणून टक्केवारीबाबत खोचक टीका केली.

Web Title: Let the waters flow, not of blood; Prakash Awad criticizes Minister Mushrif on Sulkood water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.