आॅलिम्पिकवीरांसारखी कामगिरी होऊ द्या

By Admin | Updated: July 30, 2015 00:35 IST2015-07-30T00:35:34+5:302015-07-30T00:35:34+5:30

दीनानाथसिंह : आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

Let the performance be like an Olympic champion | आॅलिम्पिकवीरांसारखी कामगिरी होऊ द्या

आॅलिम्पिकवीरांसारखी कामगिरी होऊ द्या

कोल्हापूर : आॅलिम्पिकसह जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी केल्यास राज्य शासनही योग्य दखल घेत शासकीय नोकरीत स्थान देते. आपल्या कामगिरीने देशाचे आणि राज्याचे नाव कसे उज्ज्वल होईल याकडे खेळाडूंनी लक्ष द्यावे, असा सल्ला हिंदकेसरी दीनानाथसिंह यांनी दिला. हाँगकाँग येथे झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत १२० किलो गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या अमित निंबाळकर व स्कॉट प्रकारात रौप्यपदक पटकावणाऱ्या विजय शिंदे यांच्या शिवाजी चौक येथील सत्कार प्रसंगी ते बोलत होते. दीनानाथसिंह म्हणाले, कोल्हापूरच्या मातीने अनेक दिग्गज खेळाडू देशाला दिले आहेत. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांची शासकीय पदावर थेट निवडही केली आहे. ही निवड करीत असताना त्या खेळाडूंनी खेळाच्या सातत्यात काहीच कमी केलेले नाही. यात राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, वीरधवल खाडे यांनीही कष्ट घेतले आहे. त्यांचा आदर्श ठेवूनच आजच्या खेळाडूंनीही आपल्या कामगिरीत चमक दाखवावी. कोल्हापूरला अनेक शिवछत्रपती अवॉर्ड विजेतेपद देणाऱ्या शरीरसौष्ठवमधील भीष्माचार्याला ‘गुरू द्रोणाचार्य’ पुरस्कार शासनाने द्यावा, अशी मागणीही सिंह यांनी यावेळी केली. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, नगरसेवक संभाजी जाधव, डॉ. प्रकाश संघवी, शिवछत्रपती विजेते बिभीषण पाटील, उदयसिंह निंबाळकर, पूजा पाटील, शुक्ला बिडकर, प्रियशीला गावडे, प्राजक्ता बोडके, सोनल सावंत, आसावरी ढेंगे, महमूद मुल्ला, अजिंक्य रेडेकर उपस्थित होते.

Web Title: Let the performance be like an Olympic champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.