मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत निकृष्ट कामाकडे अधिकार्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST2021-06-03T04:18:25+5:302021-06-03T04:18:25+5:30
संतप्त ग्रामस्थ मात्र संपूर्ण कामाच्या चौकशीच्या मुद्द्यावर ठाम असून, संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. ...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत निकृष्ट कामाकडे अधिकार्यांची पाठ
संतप्त ग्रामस्थ मात्र संपूर्ण कामाच्या चौकशीच्या मुद्द्यावर ठाम असून, संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून म्हासुर्ली ते कोनोलीतर्फे असंडोली या रस्त्याचे सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाचे चार किलोमीटर अंतराचे काम गेल्या तीन वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. सुरुवातीपासूनच संपूर्ण कामाचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असून पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती आपल्याकडेच आहे. त्यामुळे काम कसेही केले तरी चालते, असा ठेकेदाराचा होरा आहे. त्यातूनच काल कारपेटिंगचे निकृष्ट होत असलेले काम संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले होते. त्यामुळे चौकशीसाठी कुणीतरी अधिकारी आज प्रत्यक्ष कामावर येईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र, संबंधित विभागाचा एकही अधिकारी वा कर्मचारी या कामाकडे फिरकला नसल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी पसरली आहे.
====
सदर रस्त्याच्या कामाची गती आणि दर्जा याबद्दल यापूर्वी अनेक वेळा माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या. या बाबतीत वेळोवेळी संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना सूचना केल्या होत्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून काम निकृष्ट होत आहे. ते ग्रामस्थांनी बंद पाडले हे योग्यच आहे. या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून संबंधित विभागाचे ठेकेदाराची पाठराखण करणारे अधिकारी व ठेकेदारावर कडक कारवाईच्या सूचना संबंधित विभागाकडे करत आहे.