शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Leopard in Kolhapur: पोलिस शिपाई कृष्णा पाटील यांनी धाडसाने परतवला हल्ला-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:08 IST

बिबट्या परत मागे फिरला असता तर काही तरी अघटित घडले असते

कोल्हापूर : ताराबाई पार्कातील विवेकानंद कॉलेजसमोरील परिसराची करत असतानाच बिबट्याने अचानक पोलिस शिपाई कृष्णा पाटील यांच्यावर मंगळवारी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने धाडसाने तो हल्ला परतवून लावला. त्यांच्या या धाडसाचे मंगळवारी सर्वत्र कौतुक झाले. खरेतर पाटील हे मृत्यूच्या दाढेतूनच परत आले. कारण हल्ला केल्यानंतर ते खाली पडले होते, बिबट्या परत मागे फिरला असता तर काही तरी अघटित घडले असते. यामध्ये पाटील जखमी झाले.पाटील यांनी काठीने मारल्यामुळे बिबट्या पळून जवळच्या महावितरणच्या ड्रेनेज चेंबरमध्ये लपला. महापालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत शासकीय विश्रामगृहात होते. येथे बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षक संतोष डोके आपल्या सहकाऱ्यासोबत जात होते. त्यावेळी त्यांना ताराबाई पार्कातील वुडलॅंन्डजवळ बिबट्या आल्याचे कळाले. त्याला पाहण्यासाठी गर्दी झाल्याचे सांगण्यात आल्यानंतर ते तातडीने पोलिस कृष्णात पाटील, एच. व्ही. लंबे, इंद्रजित भोसले यांच्यासह तेथे दाखल झाले. 

वाचा : जखमी वडिलांना पाहताच मुलीने मिठी मारली अन् हंबरडा फोडलात्यानंतर परिसरात रहिवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात राहिले. परिसराची पाहणी सुरू केली. त्यावेळी बिबट्याने अचानक पथकातील पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या छातीवर, हाताला जखम झाली. ते जमिनीवर मागे पडले. तरीही उठून त्यांनी कर्तव्य बजावले. निरीक्षक डोके, पोलिस पाटील यांनी बिबट्या आला असताना जीवावर उदार होऊन धाडसाने अत्यंत कमी वेळात उपस्थितांची गर्दी पांगवून शौर्य दाखविले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी न होता बिबट्याला जिवंत पकडण्यात यश आले. मानवी वस्तीमध्ये येण्यापासून बिबट्याला हटकल्याने पोलिसांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Brave Policeman Thwarts Leopard Attack in Kolhapur, Prevents Further Harm

Web Summary : A leopard attacked policeman Krishna Patil in Kolhapur. Patil bravely fought back, preventing a potentially fatal outcome. He sustained injuries, but his courage and quick action dispersed the crowd and helped contain the leopard, averting further danger to residents.