शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: सरुड परिसरात बिबट्याचा वावर, शेतात आढळले पायाचे ठसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 12:56 IST

अनिल पाटील  सरुड : सरुड येथील बिरदेव माळ परिसरातील ऊसाच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने या परिसरात बिबट्याचा ...

अनिल पाटील सरुड : सरुड येथील बिरदेव माळ परिसरातील ऊसाच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिरदेव माळाच्या पुर्वेकडील बाजूस विश्वास कदम यांचे ऊसाचे शेत आहे. गुरुवारी दुपारी कदम यांचा मुलगा विजय कदम शेतात गेले असता त्यांना शेतातील सरीमध्ये ठिक ठिकाणी प्राण्याच्या पायाचे ठसे दिसले. त्यांनी हे फोटो काढुन मलकापूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांना पाठविले. वनअधिकारी भोसले यांनी हे ठसे बिबट्याच्या पायाचे असल्याचे सांगितले.   सरुडमधील बहुतांश शेतकऱ्यांची दुभती जनावरे बिरदेव माळ परिसरात आहेत. तसेच या परिसराला लागुनच खामकरवाडी येथे नागरी वस्ती आहे. बिबट्याकडुन येथील जनावरांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान या परिसरातील शेतकर्‍यांनी खबरदारीचा उपाय म्हणून एकट्याने शेतात जाऊ नये तसेच आप आपली जनावरे बंदिस्त शेडमध्ये बांधावीत असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्याforest departmentवनविभाग