शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

वनविभागाच्या सापळ्यामध्ये बिबट्या जेरबंद; सिध्दोबाच्या डोंगरात ४ महिन्यांपासून होता ठाण मांडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 10:36 IST

या सापळ्यात बिबट्यास अकर्षीत करण्यासाठी खाद्य ठेवुन सापळा लपवुन ठेवला होता.

शिरोली: तासगांव(ता.हातकणंगले) येथील जानेवारी महिन्यापासून सिध्दोबाच्या डोंगरात गेल्या चार महिन्यांपासून ठाण मांडून बसलेला बिबट्या मंगळवारी वनविभागाच्या सापळ्यामध्ये जेरबंद झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.मौजे तासगांव येथे महेश पाटील यांचे गोसंजीवनी गाेशाळा आहे. या गोशाळेत शंभर पेक्षा अधिक गायींचे पालन केले जाते. या गोशाळेच्या दक्षिण बाजुस घनदाट जंगल व दरी आहे.

जानेवारी महिन्यात या गो शाळेतील गायीच्या एका बछड्यावर बिबट्याने झडप घालुन त्याला जंगलात ओढत नेले.व त्याला ठार मारले. हे बछडे अर्धवट खाल्याच्या अवस्थेत गोशाळेतील कामगारांना दिसुन आले. यानंतर त्यांनी वनविभागास त्याची माहिती दिली.वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी कॅमॅरे लावुन बिबट्या असल्याची खात्री केली. त्यानंतर वनविभागाची बचाव पथकाने बिबट्या येत असल्याच्या मार्गावर लोखंडी सापळा लावला होता. या सापळ्यात बिबट्यास अकर्षीत करण्यासाठी खाद्य ठेवुन सापळा लपवुन ठेवला होता.

वनविभागाची टिम काही दिवस लक्ष ठेवून होती. मात्र बिबट्या तिकडे फिरकला नव्हता तीन महिन्यानंतर मंगळवारी रात्री अखेर स्वतःहून पिंजऱ्यात जेर बंद झाला. मौजे तासगाव येथील गो संजीवनी शाळा असलेल्या ठिकाणी सापडलेला बिबट्या हा वनविभागाने त्याला निर्जन व नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. असे वनक्षेत्रपाल आर एस कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी वनपाल एस एस जाधव, विजय पाटील यांच्यासह वन्यजीव बचाव पथकात प्रदिप सुतार,अमोल चव्हाण,विनायक माळी,असुतोष सुर्यवंशी,अलमतीन बांगी व मोजे तासगावची ग्रामस्थ यांच्या मदतीने बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या