शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- शियेत बिबटयाने केली रेडकाची शिकार, पंधरा दिवसात चौथी घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 13:54 IST

एखादी मनुष्य जीवितहानी झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का?

हरी बुवा शिये : शिये (ता. करवीर) येथे बिबट्याने हल्ला करून रेडकू फस्त केले. महिन्यातील ही चौथी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एखादी मनुष्य जीवितहानी झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.येथील शिवचा मळ्यात अनिल पाटील यांचा म्हशीचा गोठा आहे. काल, बुधवारी (दि.१९) रात्री येथील रेडकावर बिबट्याने हल्ला करून रेडकू फस्त केले. मागील आठवड्यात के.बी.खुटाळे व महादेव माने, संजय मगदूम यांच्या जनावरांच्या गोठ्यातील  वासरू बिबट्याने ठार केले होते. गेल्या पंधरा दिवसात बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी बिबट्याने हल्ला केलेल्या ठिकाणी वन विभागाच्यावतीने कॅमेरे लावण्यात आले होते. पण त्यात काही ठोस निष्पन्न झाले नाही. घटनास्थळी वनरक्षक कृष्णात दळवी पंचनामा करण्यासाठी आले असता वन विभागाकडून बिबट्या पकडण्यासाठी आतापर्यंत सापळा का लावला नाही असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.पंधरा दिवसात ही चौथी घटना असूनही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले नाहीत. एखादी मनुष्य जीवितहानी झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येणार का असा सवाल करत मानवी वस्तीतील वन्यजीव कायदा रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड. माणिक शिंदे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्याforest departmentवनविभाग