शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Leopard in Kolhapur: खाऊ पिऊ घालून बिबट्याला सोडले नैसर्गिक अधिवासात-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:21 IST

भरकटल्याने, भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्या शहरात

कोल्हापूर : गजबजलेल्या ताराबाई पार्कात पकडलेल्या ‘त्या’ बिबट्याला बुधवारी सायंकाळी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो तंदुरुस्त असल्याची खात्री करण्यात आली. नंतर खाऊ पिऊ घालून त्याला अंधार पडण्यापूर्वी नैसर्गिक अधिवासात सोडले असल्याची माहिती कोल्हापूरवनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.मंगळवारी सकाळी ताराबाई पार्कमधील नागरी आणि मध्य वस्तीत बिबट्या शिरल्यानंतर तीन तासांचा थरार परिसरातील नागरिकांनी अनुभवला. या बिबट्याने सर्वांना चांगलाच घाम फोडला होता. भीती आणि धास्तीने नागरिकांचा थरकाप उडाला होता. नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची मानून याची दखल घेऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे सदस्य, मनपाचे अग्निशमन दलाचे कर्मचारी, वाहतूक पोलिस आणि शाहूपुरी पोलिस, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.

वाचा : बिबट्याच्या हल्ल्यातील गंभीर जखमींना ५ लाखांची भरपाई बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने जाळी आणि पिंजरे लावले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. त्यानंतर त्या बिबट्याला करवीर तालुक्यातील चिखली येथील वन विभागाच्या उपचार केंद्रात आणण्यात आले. शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याच्या अंगावर कुठेही जखमा नाहीत, त्याचे पंजे चांगले आहेत तसेच त्याचा रक्तदाबही सामान्य आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याला खाऊ पिऊ घालून अखेर अंधार पडण्यापूर्वी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.भरकटल्याने, भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्या शहरातकोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी आणि कोयना तर शेजारी चांदोली आणि सागरेश्वर ही दोन अभयारण्ये आहेत. या ठिकाणाहून भरकटल्याने अथवा भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्या शहरात आला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. चांदोली लगतच्या शिराळा, मणदूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यात काही ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. जेथून आला असा अंदाज आहे अशा परिसरातील नैसर्गिक अधिवासात या बिबट्याला सोडण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही माहिती देण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेज शोध सुरूहा बिबट्या रविवारपासून शहरात फिरत असल्याचे वन विभागाने सांगितले. पहाटेच्या सुमारास जंगलातून भरकटल्याने अथवा भक्ष्याच्या शोधासाठी नागरी वस्तीत घुसला असावा, असा अंदाज आहे. त्याचे अस्तित्व नेमके कुठे होते अथवा तो कुठून आला ? याचा निश्चित अंदाज येण्यासाठी वन विभागाने या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात येत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard rescued in Kolhapur, released back into natural habitat.

Web Summary : A leopard, captured in Kolhapur's Tarabai Park, was deemed healthy after examination and released back into its natural habitat. The leopard had created panic before capture. Officials suspect it strayed from nearby sanctuaries searching for prey. CCTV footage is being reviewed to trace its path.