शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळा परिसरात बिबट्याचा बैलावर हल्ला, लोक जमा झाल्यानंतर काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 10:59 IST

पन्हाळा आणि परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आपटी गावात बुधवारी दुपारी बैलगाडी घेउन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. आरडाओरडा झाल्याने जमा झालेल्या लोकांच्या गर्दीमुळे बिबट्याने पळ काढला.बैलांनी बैलगाडीसह शेजारील शेतात पळ काढल्याने बैल बचावले, पण बैलगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देपन्हाळा आणि परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द बैलगाडी घेउन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलावर बिबट्याने केला हल्ला पळ काढल्याने बैल बचावले, पण बैलगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पन्हाळा : पन्हाळा आणि परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आपटी गावात बुधवारी दुपारी बैलगाडी घेउन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. आरडाओरडा झाल्याने जमा झालेल्या लोकांच्या गर्दीमुळे बिबट्याने पळ काढला.पन्हाळा आणि परिसरातील समृद्ध जंगलामुळे येथे अनेक वन्यप्राणी, पशुपक्षी आहेत. बिबट्याचाही वावर पूर्वापार आहे. परंतु गेली काही वर्षे या परिसरात बिबट्याचे अस्तित्व नव्हते. परंतु या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे बुधवारी सिध्द झाले.

बुधवारी दुपारी भैरोबाच्या मंदिराजवळील रहिवाशी पांडुरंग गुंडा गिरीगोसावी हे आपल्या शेताकडे बैलगाडी घेवुन येत असता बैलाच्या मागील पायावर दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यामुळे भयभित झालेल्या बैलांनी बैलगाडीसह शेजारील शेतात पळ काढल्याने बैल बचावले, पण बैलगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान शेतकरी पांडुरंग गिरिगोसावी आणि त्यांचा मुलगा स्वप्नील यांनी आरडा ओरडा केल्यानंतर परीसरातील लोक तेथे जमा झाले, यामुळे बिबट्या पळुन गेला. याच परिसरात मोठ्या प्रमाणात कोंबडी पालन व्यवसाय सुरु आहे. स्थानिक शेतकऱ्यांची घरेही या परिसरातच आहेत. विशेष म्हणजे महिलांचे वास्तव्य या परिसरात जादा आहे.

आपटी परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाने याचा बंदोबस्त करावा, या बिबट्याला पकडुन दुरच्या जंगलात सोडण्यात यावे.अमर पाटील,सरपंच, आपटी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगल