डाव्यांचं उजवंपण...

By Admin | Updated: August 12, 2014 23:13 IST2014-08-12T22:24:20+5:302014-08-12T23:13:47+5:30

डावखुऱ्यांची दुनिया न्यारी : अनेकदा येतात अडचणी तरीही त्यावर करतात मात

The left hand side ... | डाव्यांचं उजवंपण...

डाव्यांचं उजवंपण...

सातारा : असे म्हटले जाते की डावखुरेपण हे गुणसुत्रांवर अवलंबून असते. कदाचीत हे खरे असेल ही. जगातील बहुतांश लोक दैनदिन व्यवहार असोत अथवा शुभ कार्य असो उजव्या हातानेच करीत असतात. परंतू काही अशाही व्यक्ती आहेत जी आपली सर्व कामे डाव्या हाताने करतात. असे का होते हे मात्र कोणीच सांगू शकत नाही. असे असले तरी डावखुऱ्या व्यक्तिंनी उजव्या व्यक्तिंप्रमाणे सर्व कामे करून आपलं उजवपणं सिद्ध करुन दाखवलंय.
मनुष्य डावखुरा आहे की उजवा हे त्या व्यक्तिने एखादी कृती केल्याशिवाय समजूच शकत नाही. उजव्या व्यक्तिंपेक्षा डावखुऱ्या व्यक्तिंची संख्या अत्यल्प असली तरी डावखुऱ्या व्यक्ती कल्पक आणि हुशार असतात.
डाव्या हाताने काम करणाऱ्या मुलांना मोठ्यांकडून टोकले जाते. कारण आपण उजव्या हाताला परंपरेने शुभ मानत आलो आहोत. दान, धर्म एवढेत काय आशिर्वाद देण्यासाठीही उजव्या हाताचाच वापर केला जातो. या परंपरेचा डावखुऱ्या व्यक्तिंवर काही अंशी परिणाम होताना दिसतो. उजव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तिंप्रमाणेच डावखुऱ्या लोकांचे वर्तन असते. लिखान काम करताना मात्र डावखुऱ्या मुलांची तारांबळ होताना दिसते. त्यामुळे डावखुऱ्या व्यक्तिंना वापरास सोयीचे होईल अशी काही उपकरणे मुद्दाम विकसीत केली जातात.
एखादी मुलगी जर डावखुरी असेल तर तीला आपल्या सासरी याचा त्रास जाणवतो. डाव्या हाताने काम करण्याची सवय असल्याने तिला वारंवार उजव्या हाताने काम करण्याची सक्ती केली जाते. मात्र तीच्या अडचणी समजूण घेतल्या जात नाहीत. उजव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तिंनी किमान एक तास सर्व कामे डाव्या हाताने करून पहावीत, मगच त्यांना डावखुऱ्या लोकांच्या अडचणी समजू शकतील.
असे असले तरी या विश्वास अशा कितीतरी डावखुऱ्या व्यक्ती आहेत ज्यांनी आपलं उजवपणं सिद्ध करून दाखवल आहे. (प्रतिनिधी)

बहुतेक जण म्हणतात उजवा शुभ असतो. परंतू मी सर्व शुभ आणि धार्मिक कामे डाव्या हातानेच करतो. डाव्या हाताच्या वापराने लिखान काम वेगाने होते. ‘लेफ्ट ईज राईट’ हे सुत्र मी आता अंगिकारले आहे. मला उजव्या हाताने मात्र कोणतेही जड काम होत नाही.
- दतात्रय राठोड (विद्यार्थी)

मला डावखुरे असण्याची कोणतीच अडचण येत नाही, उलट डावखुरे असल्याचा अभिमान वाटतो; कारण उजव्या लोकांसारखी आमची कामेही सामान्य आहेत. अक्षर, चित्रकला चांगली आहे. असे असूनही काही लोकं डावखुऱ्यांना कमी लेखतात. विशेषता: मुलींना आणि स्त्रियांना उजव्या हाताने काम करणे भाग पडतात.
- अस्मिता पाटील (विद्यार्थी)

मी डावखुरी आहे. लेखन वगळता इतर कामे उजव्या हातानेच करते. मी जर डाव्या हाताने स्वयंकाप केला तर घरातील व्यक्ती रागवतात. डावखुरे असल्याने काही लोकांना याचे अप्रुप वाटते. डावखुऱ्या लोकांबाबत असलेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधन होने गरजेचे आहे.
- गौरी डाके (विद्यार्थी)

शाळेत असताना एकाच बेंचवर बसलं की मी डाव्या हाताने लिहायचो आणि शेजारचा उजव्या हाताने. आमच्या दोघांचे हात त्यामुळे सारखे धडकायचे. अनेकदा धार्मिक कार्यक्रमाला गेल्यावर मात्र अडचण होते. सवयीप्रमाणे मी डावा हात पुढे करतो आणि आपल्याकडे प्रसादासाठी उजवा हाताचा वापर होतो. माझं डावखुरे असणं ही माझ्यासाठी खासियतच आहे.
विक्रांत पाटील (नोकरदार)

डावखुरे
दिनविशेष...

Web Title: The left hand side ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.