शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोल्हापुरात कोरोनाबाबत जनजागृतीपर 'एलईडी मोबाईल व्हॅन' फिरणार, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 16:41 IST

कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी नियमांचे पालन व लसीकरण गरजेचे आहे. "घ्या करुन लसीकरण.. लावा कोरोनाला पळवून" हा संदेश गीतातून, संवादातून व दृकश्राव्य  जाहिरातीच्या माध्यमातून देणाऱ्या एलईडी मोबाईल व्हॅनला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला

कोल्हापूर:कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी नियमांचे पालन व लसीकरण गरजेचे आहे. "घ्या करुन लसीकरण.. लावा कोरोनाला पळवून" हा संदेश गीतातून, संवादातून व दृकश्राव्य  जाहिरातीच्या माध्यमातून देणाऱ्या एलईडी मोबाईल व्हॅनला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला तसेच फीत कापून या प्रसिद्धी मोहिमेचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उद्घाटन केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा नियोजन अधिकारी  विजय पवार, जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.कोरोना पासून संरक्षणासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर  लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने केलेल्या या जनजागृतीपर एलईडी व्हॅनच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा संदेश सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करुन कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण करुन घ्यावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून केलेल्या या एलईडी व्हॅनद्वारे जिल्ह्यातील 12 तालुक्यातील विविध गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.  या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून  "घ्या करुन लसीकरण लावा कोरोनाला पळवून", कोरोनामुक्त गाव.. लसीकरण उपाय,  हात धुणे हा स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा सोपा आणि परिणामकारक मार्ग, कोरोनापासून बचावासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना, महा आवास अभियान, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, राज्य शासनाची द्विववर्षपूर्ती आदी विषयांवर माहिती व जनजागृती करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील