‘करिअर इन अ‍ॅनिमेशन’बाबत सोमवारी व्याख्यान

By Admin | Updated: July 18, 2014 23:44 IST2014-07-18T23:43:50+5:302014-07-18T23:44:44+5:30

लोकमत युवा नेक्स्ट, सृजन इन्स्टिट्यूटचा उपक्रमकोल्हापूर

Lectures on 'Career in Animation' on Monday | ‘करिअर इन अ‍ॅनिमेशन’बाबत सोमवारी व्याख्यान

‘करिअर इन अ‍ॅनिमेशन’बाबत सोमवारी व्याख्यान

:‘अ‍ॅनिमेशन-डिझाईन’ या क्षेत्रातील करिअर संधीची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी सोमवारी
(दि. २१) दुपारी साडेचार वाजता शाहू स्मारक भवनात ‘स्कील डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड करिअर इन अ‍ॅनिमेशन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यात पुण्यातील सृजन इन्स्टिट्यूट आॅफ गेमिंग मल्टिमीडिया अ‍ॅण्ड अ‍ॅनिमेशनचे कार्यकारी संचालक संतोष रासकर मार्गदर्शन करणार आहेत. ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि सृजन इन्स्टिट्यूटने हे व्याख्यान आयोजित केले आहे.
अ‍ॅनिमेशन क्षेत्र कार्टूनपुरते मर्यादित नसून त्याचा वापर हा सध्या चित्रपट, जाहिराती या उद्योगासह ई-लर्निंग, इंटिरिअर डिझायनिंग, इंजिनिअरिंग, गेम्स, आदी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे करिअरबाबत अ‍ॅनिमेशन क्षेत्राची विद्यार्थी, पालकांना ओळख व्हावी यासाठी हे व्याख्यान आयोजित केले आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lectures on 'Career in Animation' on Monday