शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी १३ जुलैला आरक्षण सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 12:04 IST

आता सर्वांचेच लक्ष या आरक्षणाकडे लागून राहिले आहे

कोल्हापूर : राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांसाठीच्या आरक्षणाची सोडत १३ जुलै २०२२ रोजी काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने याबाबत मंगळवारी आदेश काढले. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष या आरक्षणाकडे लागून राहिले आहे. नागरिकांचा मागास वर्ग या गटातील आरक्षण वगळून हे आरक्षण काढण्यात येणार आहे. आरक्षणानंतरच राजकीय हालचाली वेगावणार आहेत.

जोपर्यंत राज्य शासन इतर मागास वर्गाच्या आरक्षणासाठी त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवता येणार नाहीत, असे स्पष्टपणे आयोगाने या आदेशामध्ये नमूद केले आहे.जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ही जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचायत समित्यांबाबत तालुक्याच्या मुख्यालयी संबंधित तहसीलदारांकडून आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आदेशातील सूचना

  • सोडतीच्या वेळी अंतिम प्रभागरचनेचा नकाशा व त्यांच्या चतु:सीमा सोडतीसाठी येणाऱ्या नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावाव्यात.
  • आरक्षणाच्या सोडतीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोडतीचा निकाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर प्रसिध्द करावा. 

आरक्षण सोडतींचा टप्पा व मुदत

  • अनु. जाती महिला, अनु. जमाती महिला व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षण सोडतीची सूचना परिशिष्टमधील नमुन्यात वृत्तपत्रातून प्रसिध्द करणे. - ७ जुलै २०२२
  • वरीलप्रमाणे आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढणे - १३ जुलै २०२२
  • सोडतीनंतर आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिध्द करणे - १५ जुलै २०२२
  • जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी - १५ ते २१ जुलै २०२२
  • सोडतीचा अहवाल, हरकती व सूचना अभिप्रायासह राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे - २५ जुलै २०२२
  • हरकतींवर निवडणूक विभाग निर्वाचक गणाचे आरक्षणास मान्यता देणे - २९ जुलै २०२२ पर्यंत
  • अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करणे - २ ऑगस्ट २०२२
टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती