शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गेली तीन वर्षे रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची गळती, कोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 12:28 IST

शहरात एकीकडे पाण्यासाठी नागरिकांचा ठणठणाट सुरु असतानाच लाखो लिटर पाणी जातंय वाया

कोल्हापूर : शहरातील जलवाहिनींना गळती ही आता नवीन बाब राहिलेली नाही. निम्म्या ई वॉर्डाला पाणी पुरवठा करणाऱ्या कसबा बावडा येथील पंप हाऊसमधून गेली तीन वर्षे रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उघड केला. या गळतीकडे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. कसबा बावडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ई वॉर्डाला पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रातील पंप हाऊसमधून गेली तीन, चार वर्षे रोज चार एमएलडी म्हणजे ४० लाख लिटर शुद्ध पाणी वाहून जात असल्याचा धक्कादायक प्रकार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी उघडकीस आणला. चार वर्षांपासून असलेली गळती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने काढलेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे लाखो रुपये वाया जात आहेत. कृती समितीचे ॲड. बाबा इंदूलकर, आर. के. पोवार, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांनी जल अभियंत्यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर तांत्रिक विभागाचे सहायक अभियंता जयेश जाधव यांनी त्याठिकाणी भेट दिली. गेली दोन वर्षे पाणी वाहून जात असल्याचे जाधव यांनी मान्य केले.पुईखडी, चंबुखडी आणि कसबा बावडा येथील शुद्धीकरण केंद्रातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. नदीमध्ये भरपूर पाणी आहे, पाण्याची उचलही दिवसाला १५० ते १६० एम.एल.डी. होते; पण गळतीमुळे उचललेल्या पाण्यापैकी ६० टक्के पाण्याचे बिलिंग होते. गळतीमुळे भरपूर पाणी असूनही नागरिकांना मात्र पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून लक्ष दिलेलं नाही, असा आरोप ॲड. बाबा इंदूलकर यांनी केला आहे.गळती होणाऱ्या पाण्याचा पुनर्वापरकसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरातील संपाची बारा वर्षांपूर्वी दुरुस्तीची व गाळ काढण्याची कामे केली आहेत. तसेच या संपामध्ये येणाऱ्या रॉ वॉटर व जाणाऱ्या फिल्टर वॉटर पाइपचे काम चार वर्षांपूर्वी पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले होते. त्यावेळी होणाऱ्या पाण्याची गळती थांबविण्यात आली होती. हा दगडी बांधकामाचा संप पूर्वीचा असल्याने या ठिकाणी अमृत १ योजनेमधून नवीन संप बांधण्याचे काम प्रस्तावित केले असून, काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. ते पूर्ण झाल्यावर जुना संप वापरणे बंद केले जाणार आहे. या ठिकाणी संपाच्या तळातून व भिंतीतून पाण्याची गळती आहे. गळतीचे पाणी संपाच्या कोपऱ्यातून बाहेर एकत्रित करून पुन्हा पंपाने उचलून रिसायकल संपामध्ये टाकण्यात येते, असा खुलासा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी