पत्रके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:01+5:302021-01-08T05:15:01+5:30
कोल्हापूर : ई.पी.एस.९५ च्या निवृत्तीवेतनधारकांची मासिक सभा सोमवारी (दि.११) दुपारी चार वाजता लक्ष्मीपुरीतील श्रमिक कार्यालयात होणार आहे. या सभेत ...

पत्रके
कोल्हापूर : ई.पी.एस.९५ च्या निवृत्तीवेतनधारकांची मासिक सभा सोमवारी (दि.११) दुपारी चार वाजता लक्ष्मीपुरीतील श्रमिक कार्यालयात होणार आहे. या सभेत पेन्शनवाढीसंदर्भात आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. सोशल मीडियावरून येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे सर्व श्रमिकचे सचिव अनंत कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.
इंदुमतीदेवी हायस्कूलमध्ये रेसिंग डे साजरा
कोल्हापूर : येथील प्रिन्सेस इंदुमतीदेवी हायस्कूलमध्ये शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत रेझिंग डे अभियानाअंतर्गत वाहतूक रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक मधुकर चौगुले यांनी केले. या अंतर्गत वाहतुकीबाबतचे नियम, वाहतूक रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सहाय्यक फौजदार शिवाजी गोणी, विठ्ठल जरग, प्रशांत कारेकर यांनी सादर केले. स्वागत पर्यवेक्षिका वर्षा पाटील, सीमा सूर्यवंशी व सूत्रसंचालन रूचिरा रूईकर यांनी केले. पल्लवी जाधव यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापिका प्रेरणा जाधव, ज्येष्ठ शिक्षिका सुलोचना कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
सावित्रीबाई अन् जोतिबांमुळेच स्त्री आत्मनिर्भर
कोल्हापूर : ज्या काळात बालविवाह,जरठ विवाह, सती प्रथा व जाती विषमतेचे प्राबल्यहोते. त्या काळात फुले दाम्पत्याने सामाजिक परिवर्तन घडवून स्त्रीला आत्मनिर्भर बनविले, असे प्रतिपादन डाॅ. अक्षता गावडे यांनी केले. त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू काॅलेज येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. सुरेश साळुंखे होते.
गावडे म्हणाल्या, स्त्रियांना शिक्षण, आत्मसन्मान व आत्मनिर्भरता व निर्भिडता फुले दाम्पत्यामुळेच प्राप्त झाली आहे. जगाशी स्पर्धा करणारे ज्ञान व कौशल्ये स्त्रियांनी आत्मसात करावीत. प्रास्ताविक डाॅ. भाग्यश्री पुणतांबेकर व सूत्रसंचालन ज्योती कांबळे यांनी केले. प्रा. माधुरी पाटील यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.