शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: संजय मंडलिक मुंबईत तळ ठोकून, माने मतदारसंघात; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 13:02 IST

कोल्हापूर : महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार जाहीर होत नसल्याने नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. एकीकडे ...

कोल्हापूर : महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार जाहीर होत नसल्याने नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. एकीकडे कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवातच केली असताना दुसरीकडे दिल्लीतून नावे कधी जाहीर होणार, यांची महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, खासदार संजय मंडलिक हे मुंबईत तळ ठोकून असून, धैर्यशील माने हे मात्र शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात येऊन त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत.मुंबईतून महायुतीच्या उमेदवारांची जी यादी दिल्लीला गेली आहे. त्यामध्ये मंडलिक आणि माने या दोघांचीही नावे असल्याचे सांगण्यात येते. आपल्या कोणत्याही खासदारांची उमेदवारी कापली गेली तर त्याचा आमदारांपर्यंत संदेश चांगला जाणार नाही. हे शिवसेनेसाठी तसेच महायुतीसाठीही धोक्याचे असल्याचे शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना पटवून दिले आहे. त्यामुळे या दोघांची उमेदवारी निश्चित मानली जाते. परंतु एकूणच भाजपच्या उमेदवारी जाहीर करण्यातील धक्कातंत्रामुळे जोपर्यंत दिल्लीतून नावांची घोषणा होत नाही, तोपर्यंत अनेकांच्या जिवात जीव नाही, ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिवसभरामध्ये कोल्हापुरात अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. संध्याकाळनंतर दोन तास त्यांनी भाजपच्या कार्यालयामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. खासदार धनंजय महाडिक, विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील यांनी उमेदवारीबाबत फारसे भाष्य न करता महायुती जो उमेदवार देईल, त्याच्या विजयासाठी परिश्रम करण्याच्या सूचना सर्वांना दिल्या.

हालचालच करता येईनाजोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत काहीच करता येईना, अशी परिस्थिती मंडलिक आणि माने यांच्या कार्यकर्त्यांची झाली आहे. कोणत्याही गावात जायचे म्हटले तरी उमेदवारीबाबत विचारले की मग होईल दोन दिवसांत जाहीर, असे सांगावे लागत आहे. त्यामुळे मतदारसंघात फिरणाऱ्या मंडलिक यांनीही फिरती बंद करून मुंबई गाठली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेना