सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:24 IST2021-04-20T04:24:31+5:302021-04-20T04:24:31+5:30

साहेबांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू आहे. गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्या साहेबांना जनतेच्या सुखदु:खांची ...

A leader who empowers the common worker | सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता

सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता

साहेबांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू आहे. गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्या साहेबांना जनतेच्या सुखदु:खांची नस सापडली आहे. म्हणूनच जनतेत त्यांची ओळख सर्वसामान्य जनतेचे असामान्य नेतृत्व, वृद्धांचा श्रावणबाळ, निराधारांचा आधार व मोठ्या आजाराने पिढीत झालेल्या रुग्णांसाठी मोफत सेवा देणारा देवदूत अशी झाली.

साहेबांनी आजपर्यंत राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले आहे. तालुक्यातील विकासासाठी त्यांनी कधीच निधी कमी पडू दिला नाही. अतिशय दूरदृष्टी व कामाचा मोठा आवाका असल्याने कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघाला विकासाचे माॅडेल बनविले आहे. मुत्सद्देगिरी व प्रचंड मेहनत यामुळे जीवनात अनेक आव्हाने लीलया पेलली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी मुश्रीफ साहेबांवर विश्वास दाखवीत महाराष्ट्र मंत्रिमंडळात जबाबदारी सोपविली व या लोकनेत्याचा सन्मान केला. तालुक्यातील निराधारांचा आधार असणाऱ्या या नेतृत्वाने महाराष्ट्रात दबदबा निर्माण केला आहे. कार्यकर्त्यांच्या हितासाठी व सामान्य जनतेसाठी रात्रंदिवस धडपडणाऱ्या नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

जोती दादूू मुसळे ( मा. पं. स. सदस्य)

Web Title: A leader who empowers the common worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.